Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Vishwajeet Rane health minister: बांबोळी येथील तृतीय श्रेणी कर्करोग केंद्राच्या बांधकामाबाबतही आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली
Bambolim Cancer Centre Goa
Bambolim Cancer Centre GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा प्रशासकीय कामांसाठी रुग्णवाहिकांचा गैरवापर होत असल्याच्या चर्चांना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पूर्णविराम दिला आहे. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना राणे यांनी स्पष्ट केले की, ज्या गाड्या रुग्णवाहिका म्हणून सक्रियपणे वापरल्या जातात, त्या कोणत्याही इतर कामांसाठी वळवल्या जात नाहीत. रुग्णसेवा हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्करोग केंद्राचे काम लवकरच पूर्णत्वास

बांबोळी येथील तृतीय श्रेणी कर्करोग केंद्राच्या बांधकामाबाबतही आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या केंद्राचे ३०% काम पूर्ण झाले आहे. एकदा मुख्य इमारत उभी राहिल्यानंतर इतर सर्व कामे वेगाने पूर्ण केली जातील.

राज्यातील नागरिकांना अत्याधुनिक कर्करोग उपचार मिळावेत यासाठी हे केंद्र उभारले जात असून, पुढील विधानसभा निवडणुकांपूर्वी हे केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

Bambolim Cancer Centre Goa
Mental Health Crisis: चिंता आणि नैराश्यात बुडाली ‘डिजिटल पिढी’; तरुणपणातच Gen Z सर्वात दुःखी, जागतिक अभ्यासातून धक्कादायक खुलासा

या केंद्राच्या उभारणीमुळे केवळ गोव्यातीलच नाही तर, शेजारील राज्यांतील रुग्णांनाही याचा फायदा होणार आहे. गोवा सरकार आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि नागरिकांना जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यातून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com