Balrath Worker Strike Dainik Gomantak
गोवा

Balrath Worker Strike: ...अन्यथा पुन्हा राज्यभरात बालरथ सेवा बंद करू! स्वाती केरकरांचा सरकारला इशारा

स्वाती केरकर: जर येत्या विधानसभा अधिवेशनापर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर पुन्हा एकदा राज्यभरातील बालरथ सेवा बंद करण्यात येतील

Kavya Powar

Balrath Worker Strike: वेतनवाढीसाठी बालरथ कामगारांनी सुरू केलेला संप जुलैमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर एकही मागणी पूर्ण झाली नाही. यामुळे बालरथ कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले असून सरकारच्या कामावर ताशेरे ओढले.

कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, वेतन थेट बँकेत जमा होणे, नोकरीबाबत अधिकृत आदेश काढणे अशा मागण्या बालरथ कामगारांनी केल्या होत्या. मात्र आश्वासन देऊनही त्या पूर्ण झाल्या नाहीत.

त्यासोबतच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येते. त्यांना त्यांचा आधीचा पगारही दिला जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. कामावरून काढून टाकताना कोणतेही कारण दिले जात नाही. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना झाल्याच पाहिजेत, असे स्वाती केरकर यांनी सांगितले.

जर येत्या विधानसभा अधिवेशनापर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर पुन्हा एकदा राज्यभरातील बालरथ सेवा बंद करण्यात येतील, असा इशारा केरकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT