डिचोली: गोवा मुक्ती लढ्यातील प्रथम बलिदान देणाऱ्या हुतात्मा बाळा राया मापारी यांचे बलिदान प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या बलिदानाचे कायम स्मरण राहावे म्हणून बाळा मापारी यांचे कायमस्वरूपी हुतात्मा स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. हुतात्मा बाळा राया मापारी यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. १८) ‘बलिदान दिवस’ पाळण्यात आला. त्यानिमित्त अस्नोडा येथील स्मारकाजवळ आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
बाळा राया मापारी यांचे स्मारक त्यांच्या मुलीच्या शिवोली गावात उभारण्यात येणार असून एका वर्षाच्या आत हा संकल्प पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शासकीय पातळीवरील या कार्यक्रमास जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, जिल्हा पंचायत सदस्य दीक्षा कांदोळकर, अस्नोड्याचे सरपंच मेघश्याम चोडणकर, उपसरपंच सपना मापारी, भंडारी समाजाचे अध्यक्ष देवानंद नाईक, हुतात्मा बाळा मापारी यांची कन्या लक्ष्मी आगरवाडेकर उपस्थित होत्या.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी १५ ऑगस्ट १९५५ रोजी पत्रादेवी येथे शाहिद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. पोर्तुगीजांनी पत्रादेवी येथे एकूण ३३ स्वातंत्र्यसैनिकांवर गोळ्या झाडल्या होत्या. या कुटुंबीयांचा प्रत्येकी दहा लाख रुपये धनादेश देऊन सन्मान करण्यात आला आहे. आज गोव्यात अनेकांनी केवळ स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांमधून आहे म्हणून सरकारी नोकऱ्या मिळवल्या आहेत, मात्र हीच लोकं मुक्तिदिन किंवा क्रांतिदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत याची खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.