CM Pramod Sawant: 30 मे पर्यंत गोव्यात कुणीही निरक्षर राहणार नाही; परप्रांतीयांना देखील सामावून घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Goa Literacy Initiative : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज साक्षर झालेल्या अनेक गोमंतवसायींना प्रशस्तीपत्रक बहाल करण्यात आली
Goa Education
Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी (२६ जानेवारी) झालेल्या उल्हास मेळाव्यात बोलताना गोवा लवकरच १०० टक्के साक्षरतेचा आकडा गाठेल असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार जर का गोव्याने हा उद्देश सध्या करून दाखवला तर संपूर्ण देशात १०० टक्के साक्षर असणारं गोवा हे पाहिलं राज्य बनेल.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज साक्षर झालेल्या अनेक गोमंतवसायींना प्रशस्तीपत्रक बहाल करण्यात आली. गोव्यातील साक्षरतेबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी प्रौढ साक्षरता मोहिमेवर भर दिला, ते म्हणाले की कारणास्तव ही मोहीम पूर्ण होऊ शकली नाही पण राज्यातील किंवा देशातील प्रत्येकाला लिहायला-वाचायला येणं, स्वतःची सही करता येणं महत्वाचं आहे.

Goa Education
CM Pramod Sawant: विद्यार्थ्यांनो देशासाठी जगा! मुख्यमंत्री सावंताकडून हाक; डिचोलीत ‘वंदे मातरम्’ उत्साहात

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारत शैक्षणिक अभियानाला सुरुवात केली. गोव्यातील निरक्षरांना मदत करण्यासाठी गावागावांमध्ये अशा व्यक्तींचा शोध सुरु झाला आणि कामानंतर त्यानं शिक्षणाचे धडे गिरवता यावे म्हणून प्रयत्न सुरु झाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना शिक्षणाची गोडी असलेल्या आणि शिकण्यासाठी पुढे आलेल्या प्रत्येकाचं कौतुक केलं.

मुख्यमंत्री म्हणले की गोवा सरकार १०० टक्के संरक्षरतेबद्दल प्रयत्नशील आहे. या नवीन मोहिमेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला एक विशेष परीक्षा द्यावी लागणार आहे, ज्यात उत्तीर्ण झाल्यानंरच त्यांना साक्षरतेचा दाखला दिला जाईल. केंद्र सरकारकडून गोव्यात होणाऱ्या या परीक्षांची तपासणी केली जाणार आहे. जो व्यक्ती या परीक्षेत अनुत्तीर्ण होईल त्याला पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागेल.

सध्या ९४ टक्के गोवा साक्षर आहे, आणि राहिलेल्या ६ टक्के गोमंतवसियांना लवकरच साक्षर बनवले जाईल, यामध्ये गोव्यात असलेल्या परप्रांतीयांचा देखील समावेश असेल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या नवीन उपक्रमात निरक्षर लोकांना लिहायला-वाचायला तसेच अंकांचे ज्ञान दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com