Uday Bhembre Dainik Gomantak
गोवा

Uday Bhembre: बजरंग दलाच्या विराज देसाईं आणि अन्य कार्यकर्त्यांविरोधात भेंब्रे यांची पोलिस तक्रार; वादग्रस्त वक्तव्य प्रकरण

Uday Bhembre On Shivaji Maharaj: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विचारवंत उदय भेंब्रे यांच्या घरासमोर उग्र निदर्शने केल्यानंतर भेंब्रे यांनी फातोर्डा पोलिसांत तक्रार नोंदविली.

Sameer Panditrao

मडगाव: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री विचारवंत उदय भेंब्रे यांच्या घरासमोर उग्र निदर्शने केल्यानंतर आज भेंब्रे यांनी बजरंग दलाचे गोवा राज्यप्रमुख विराज देसाई आणि अन्य कार्यकर्त्यांच्या विरोधात फातोर्डा पोलिसांत तक्रार नोंदविली.

याप्रकरणी फातोर्डा पोलिस स्थानकाचे निरीक्षक नाथन आल्मेदा यांना विचारले असता, याप्रकरणी आमच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप कोणावरही एफआयआर दाखल केलेला नाही. परंतु प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, असे सांगितले.

या तक्रारीत भेंब्रे यांनी विराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री सुमारे २५ जणांच्या जमावाने माझ्या घराच्या आवारात बेकायदा प्रवेश केला आणि त्यानंतर गडबड गोंधळ केला, असे म्हटले आहे.

शुक्रवारी रात्री जारी केलेल्या एका व्हिडिओत विराज देसाई यांनी, ‘उदय भेंब्रे हे पूर्णतः हिंदूद्वेष्टे असून आतापर्यंतची त्यांची सर्व वक्तव्ये हिंदूंची अवहेलना करणारी आणि पोर्तुगिजांची भलावण करणारी असल्याचा दावा केला आहे.

शिवाजी महाराज गोव्यात आले होते आणि गोव्यात त्यांचे राज्य होते, याचे अनेक पुरावे आहेत. भेंब्रे ज्या पुस्तकांचा उल्लेख करतात, त्या पुस्तकांतही त्याचा उल्लेख आहे. मात्र, भेंब्रे आता वयोवृद्ध झाले आहेत. त्यामुळे हे ग्रंथ वाचताना त्यांच्या नजरेला हे उल्लेख दिसले नसतील. त्यांना पाहिजे असल्यास आम्ही ही पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहोचवू, असे विराज देसाई यांनी म्हटले आहे.

प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

उदय भेंब्रे हे स्‍वत:ला जरी विचारवंत म्‍हणत असतील तरी प्रत्‍यक्षात ते हिंदूद्वेष्‍टे आहेत. त्‍यांना शिवाजी महाराजांचा अपमान करण्‍याचा अधिकार कुणीही दिलेला नाही. असे म्‍हणत शुक्रवारी रात्री उशिरा बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्यांनी भेंब्रे यांच्‍या प्रतिकात्मक पुतळ्‍याचे दहन केले.

मग नार्वेचे देऊळ कोणी उभारले?

शिवाजी महाराज गोव्‍यात आलेच नाहीत, असा दावा भेंब्रे करतात. असे असेल तर नार्वेचे देऊळ कोणी बांधले आणि बेतूलचा किल्‍ला बांधण्‍याचा आदेश शिवाजी महाराजांनी आपल्‍या सरदाराला कसा दिला असा सवाल देसाई यांनी केला. भेंब्रेंसारख्‍याच काही व्‍यक्‍ती खोटा इतिहास पसरवितात. त्‍यामुळे लाेकांना खरा इतिहास समजतच नाही, असा आरोप देसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT