Bajrang Dal Goa News Dainik Gomantak
गोवा

Bajrang Dal Goa: युनिफॉर्मसोबत बुरखा चालत असेल तर शाल, फेट्यालाही परवानगी द्या! उत्तर गोवा बजरंग दलाची मागणी

Goa Uniform Policy: नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुसार गोव्यातील महाविद्यालयांना देखील युनिफॉर्मचा वापर करणं अनिवार्य आहे

Akshata Chhatre

साखळी: नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुसार गोव्यातील महाविद्यालयांना देखील युनिफॉर्मचा वापर करणं अनिवार्य आहे. मात्र यावर रविवारी (दि. १९ डिसेंबर) रोजी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सरकारी महाविद्यालय साखळी येथे युनिफॉमसोबत वापरल्या जाणाऱ्या बुरखावर आक्षेप व्यक्त केला. त्याच्या मतानुसार जर का युनिफॉर्म सोबत बुरख्याला परवानगी असले तर ते देखील त्यांच्या युनिफॉर्म सोबत शाल आणि फेटा घालण्याची देखील परवानगी दिली पाहिजे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मतानुसार युनिफॉर्मसोबत बुरख्याचा वापर म्हणजे एकार्थी युनिफॉर्मचा केलेला अनादर आहे आणि तरीही जर का काही विद्यार्थी हिजाब घालून येणार असतील तर बाकी मुलांना देखील मनमानी करण्याची परवानगी दिली पाहिजे.

सरकारी महाविद्यालय साखळी येथील काही विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी काही दिवसांसाठी युनिफॉर्मसोबत हिजाब वापरण्याची परवानगी दिली आहे आणि डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशनचा निर्णय मात्र हिजाबच्या बाबतीत अंतिम असणार आहे आणि तोपर्यंत बुरखा वापरला जाऊ शकतो.

विद्यार्थ्यांमध्ये समानता आणण्यासाठी म्हणून युनिफॉर्म आणण्यात आलाय आणि काही विद्यार्थी जर का असे विरुद्ध वागणार असतील तर बजरंग दलाला त्यांचा हा निर्णय मान्य नाही. बजरंग दाल उत्तर गोवा संयोजक आणि विदयार्थी प्रतिनिधी यांनी साखळीतील सरकारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची आज भेट घेतली.

प्राचार्यांनी त्यांना काही दिवसांत यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच जर का सांगितल्याप्रमाणे कारवाई झाली नाही तर बजरंग दल यावर नक्कीच कारवाई करेल असा इशारा देखील देण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुसार आणलेल्या युनिफॉर्मचे सर्व महाविद्यालयांमध्ये पालन व्हावे त्यावर कुठल्याही प्रकारची टोपी, कॅप किंवा बुरखा घालून त्याचा अनादर करू नये असा इशारा बजरंग दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT