Mormugao Gates Dainik Gomantak
गोवा

Baina: बायणातील गेट, कुंपणप्रश्‍न ‘जैसे थे’! मुरगाव पालिका, बंदर प्राधिकरणाची बैठक निर्णयाविना

Mormugao Port Gates: बायणा येथे मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) उभारलेली दोन लोखंडी फाटके व कुंपणासंबंधी सोमवारी (ता.२३ ) झालेल्या संयुक्त बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही.

Sameer Panditrao

वास्को: बायणा येथे मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) उभारलेली दोन लोखंडी फाटके व कुंपणासंबंधी सोमवारी (ता.२३ ) झालेल्या संयुक्त बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही.

ती फाटके व कुंपण मागे घ्यावे, जेणेकरून तेथे अपघाताची भीती दूर होईल, असा सूर मुरगाव पालिका मंडळाचा होता. तुम्हाला पाहिजे तर आम्ही त्या कुंपणाची उंची कमी करतो असा प्रस्ताव एमपीएच्या प्रतिनिधींनी ठेवला.

मात्र संबंधित तोडगे एकमेकांना मान्य न झाले नाहीत. या बैठकीचा अहवाल एमपीएचे अध्यक्षांसमोर ठेवल्यावर, त्यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे एमपीएच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. यासंबंधी वास्को सप्ताहापूर्वी सुवर्णमध्य काढण्यात यावा, अशी विनंती पालिका मंडळाने केली.

मुरगाव बंदर प्राधिकरणाने बायणातून उड्डाण पुलावर जाणाऱ्या रस्त्याच्या आरंभी दोन लोखंडी फाटके व कुंपणे उभारली आहेत. कुंपणाची भिंत रस्त्याकडेला उभारण्यात आल्याने तो भाग अपघातप्रवण स्थळ झाल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. फाटके उभारल्याने एमपीए ती कधीही बंद करू शकतात, अशी भीती स्थानिकांना वाटते, मात्र ती फाटके चोवीस तास खुली असतील असे लेखी आश्वासन एमपीएने दिले आहे, तरीही प्रश्न मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत सतत गाजत आहे.

या बैठकीला नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेवक दीपक नाईक, मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, काही नगरसेवक,नगरसेविका, एमपीएचे प्रतिनिधी, वाहतूक पोलिस निरीक्षक आल्विटो रॉड्रिग्ज, मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT