Mormugao: मुरगाव बंदरात डेल्टा पोर्ट्‌सकडून विक्रम, 24 तासांत 30 हजार टन लोहखनिज पॅलेट्स भरून रचला इतिहास

Delta Ports Goa: मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक दहावरील सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) अंतर्गत कार्यरत असलेल्या डेल्टा पोर्ट्स मुरगाव टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडने एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
Mormugao
MormugaoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक दहावरील सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) अंतर्गत कार्यरत असलेल्या डेल्टा पोर्ट्स मुरगाव टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडने (Delta Ports Mormugao Terminal Pvt. Ltd.) एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. केवळ २४ तासांच्या आत ३०,५८१ मेट्रिक टन लोहखनिजाच्या गोळ्यांची (Pellets) जहाजात यशस्वी चढती करण्यात आली.

ही मालवाहतूक मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) साठी केली जात असून एकूण ६७,५०० मेट्रिक टन लोहखनिज गोळ्या जहाजातून पाठवण्यात येणार आहेत. यासाठी १६ जून रोजी ‘विश्व चेतना’ हे जहाज मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक १० ला लागले होते. अवघ्या एका दिवसात अर्ध्याहून अधिक मालाची यशस्वी चढती करण्यात आली.

Mormugao
80 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, दुसऱ्यावेळा बलात्काराच्या तयारीत असतानाच पकडले; '50 वर्षीय' आरोपीला 4 दिवसांची कोठडी

या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुरगाव पोर्ट ट्रस्टचे (MPT) अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार यांनी डेल्टा पोर्ट्स व एमटीपीएलच्या टीमचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “हा विक्रम म्हणजे डेल्टा पोर्ट्स मुरगाव टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड व एमटीपीएलच्या टीममधील ऑपरेशनल उत्कृष्टता, समर्पण आणि समन्वयपूर्ण प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे.”

Mormugao
Goa Cabinet: दिगंबर कामतांचे मंत्रिपद नक्की? दिल्लीत ठरणार यादी; इतर नावांविषयी वाढली उत्कंठा

मुरगाव बंदरात अशा प्रकारचा वेग आणि अचूकतेसह झालेला मालहस्ती व्यवहार हा बंदर क्षमतेचा आणि तंत्रज्ञानाच्या वापराचा प्रभावी पुरावा मानला जातो. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर व्यापार आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील संधी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com