Baina gate Dainik Gomantak
गोवा

Baina: बायणावासीयांना ‘एमपीए’कडून धक्का! फाटक हटविण्याऐवजी बसवले ग्रिल्स; स्थानिक रहिवाशांमध्ये संताप

MPA Baina Gate: बायणातील त्या वादग्रस्त फाटकांसंबंधी निर्णय घेताना मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) तेथील कुंपणाची उंची कमी केली, तसेच त्या लोखंडी फाटकांचा वरचा अर्धा भाग कापून तिथे लोखंडी ग्रिल्स घातली.

Sameer Panditrao

वास्को: बायणातील त्या वादग्रस्त फाटकांसंबंधी निर्णय घेताना मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) तेथील कुंपणाची उंची कमी केली, तसेच त्या लोखंडी फाटकांचा वरचा अर्धा भाग कापून तिथे लोखंडी ग्रिल्स घातली. पंधरा दिवसांपूर्वी फाटकांचा वरचा अर्धा भाग कापल्याने खुश झालेल्या बायणावासीयांच्या आनंदावर विरजण पडले.

‘एमपीए’ने सोमवारी धक्का देत त्या कापलेल्या भागावर ग्रिल्स घातली. त्यामुळे तेथे फाटके हवीतच कशाला असा प्रश्‍न केला जात आहे. रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी ‘एमपीए’ स्वतः एक सरकार झाले काय, असा प्रश्‍न केला. मात्र, त्या फाटकांच्या वरच्या भागात ग्रिल्स लावल्याने समोरून येणारी वाहने सहजपणे दिसतात, असा दावा ‘एमपीए’चा आहे.

येथे जानेवारीत उड्डाण पुलाचे उद्‍घाटन झाल्यावर ‘एमपीए’ने बायणा येथे दोन फाटके व कुंपण उभारली होती. ती फाटके व कुंपण उभारल्याबद्दल बायणावासीयांनी संताप व्यक्त केल्याने ती फाटके वादग्रस्त ठरली होती. ती फाटके तेथून हटवा, अशी मागणी जोर धरू लागली होती. याची दखल घेऊन वास्कोचे आमदार दाजी साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, स्थानिक नगरसेवक दीपक नाईक, जयंत जाधव वगैरेंनी ती फाटके हटवावीत, अशी मागणी केली होती.

मुरगाव पालिका मंडळ व ‘एमपीए’च्या अधिकाऱ्यांची खास बैठक झाली होती. फाटके व कुंपणामुळे तो भाग अपघातप्रवण भाग झाल्याचा दावा करून ती हटविण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली होती. त्यावेळी त्या फाटकांची व कुंपणाची उंची कमी करण्याचा प्रस्ताव एमपीए अधिकाऱ्यांनी ठेवला होता.

परंतु तो मान्य करण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही अध्यक्षांसमोर बैठकीचा अहवाल ठेवतो, त्यानंतरच पुढील कृती होईल, असे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. ती जागा ‘एमपीए’ची आहे, तेथे बायणात उतरण्यासाठी जो उड्डाण पूल बांधण्यात आला आहे, तो ‘एमपीए’च्या निधीतून बांधल्याचे स्पष्ट केले होते. तेथे एमपीएची मोठी जागा असल्याने तिच्या सुरक्षेसाठी फाटके उभारल्याचा दावा करण्यात आला होता.

‘एमपीए’चे लेखी आश्‍वासन

यासंबंधी मुख्यमंत्र्यांना एका शिष्टमंडळाने भेटून निवेदन दिले. तर दुसरीकडे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी एमपीएचे अध्यक्ष विनोदकुमार यांची भेट घेऊन त्या फाटकांसंबंधी चर्चा केली, तेव्हा त्यांनी ती फाटके सुरक्षेसाठी लावली आहेत. तथापि वाहतुकीसाठी ती २४ तास उघडी असतील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे आमोणकर यांचे समाधान झाले होते. मात्र, इतरांनी ती फाटके तेथून हटविली पाहिजेत, अशी मागणी केली. याप्रकरणी उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी लक्ष घातल्यावर ‘एमपीए’ने ती फाटके चोवीस तास उघडी असतील,असे लेखी स्वरुपात दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

SCROLL FOR NEXT