Baina Accident Dainik Gomantak
गोवा

Baina Accident: बायणात भरधाव कारचा थरार! 3 वाहनांना दिली धडक; नियंत्रण जाऊन गाडी झाली पलटी

Baina Car Accident: सासमोळे–बायणा परिसरात शुक्रवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भरधाव कारने तीन वाहनांना धडक दिल्यानंतर पलटी घेतली.

Sameer Panditrao

सासमोळे–बायणा परिसरात शुक्रवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भरधाव कारने तीन वाहनांना धडक दिल्यानंतर पलटी घेतली. या अपघातात कारचा चालक जखमी झाला असून दोन दुचाकी आणि एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात गणपती मंदिराच्या मागील मुख्य रस्त्यावर घडला. अपघातग्रस्त कार वास्कोहून काटे बायणा दिशेने भरधाव वेगाने जात होती. दरम्यान, अचानक वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने प्रथम पदपथावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली.

त्यानंतर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका कारला धडक देत वाहन उलटले. अपघातात चालकाच्या हाताला तसेच शरीराच्या इतर भागांना मार लागला असून त्याला उपचारासाठी हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती.

घटनेची माहिती मिळताच वास्को पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने पलटलेली कार बाजूला करण्यात आली आणि वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. दरम्यान, या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने येथे गतिरोधक उभारण्याची मागणी स्थानिकांकडून अनेकदा करण्यात आली आहे. मात्र शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT