Valshi Accident: वाळशी जंक्शनवर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; दोघे जखमी

Valshi Accident Nes: सत्तरी तालुक्यातील वाळशी जंक्शनवर एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये एका भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली.

सत्तरी तालुक्यातील वाळशी जंक्शनवर एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये एका भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाळशी जंक्शनवर वळण घेत असताना हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. वळपई पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. या जंक्शनवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांनी चिंता व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com