Bail granted to Dharmesh Saglani Dainik Gomantak
गोवा

धर्मेश सगलानी यांना सशर्त जामीन मंजूर

सगलानी यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते

दैनिक गोमन्तक

साखळी मतदारसंघातील काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते धर्मेश सगलानी यांना एका कथित जुन्‍या खंडणी प्रकरणी आगशी पोलिसांनी ताब्‍यात काल ताब्यात घेतले होते. नुकत्‍याच संपलेल्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या काळापासून सगलानी यांच्‍याभोवती हा पोलिसांचा ससेमिरा लागला आहे. सगलानी यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान सगलानी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज न्यायालयाने सुनावणी केली आहे. न्यायालयाने (court) धर्मेश सगलानी यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. (Bail granted to Dharmesh Saglani)

साखळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवताना धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) यांनी भाजपचे प्रतिस्‍पर्धी उमेदवार मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना घाम फोडला होता. काही राजकीय विश्‍‍लेषकांनी तर साखळीत (Sanquelim) सगलानीच बाजी मारून ‘किंग मेकर’ ठरणार असल्‍याचे भाष्‍य केले होते. त्‍यांना मतदारसंघात मिळणार प्रतिसाद पाहिल्‍यास अनेकजण त्‍यांच्‍या विजयाची खात्री व्‍यक्त करत होते.

मतमोजणी दिवशीही सगलानी यांनी पहिल्‍या टप्‍प्‍यात सावंत यांना पिछाडीवर टाकले होते. पण नंतर जोरदार मुसंडी मारत प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी अवघ्‍याच मतांनी सगलानी यांचा पराभव केला होता. पण या निवडणुकीच्‍या काळापासूनच सगलानी हे कथित खंडणी प्रकरणी पोलिसांच्‍या (police) निशाण्‍यावर आले होते. काल पुन्‍हा एकदा त्‍यांना आगशी पोलिसांनी ताब्‍यात घेतले असून गुन्‍हा शाखेच्‍या कार्यालयात चौकशी होण्‍याची शक्‍यता होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT