Court  Dainik Gomantak
गोवा

Margao News : घरफोडीप्रकरणी पॉलसिंग चिमाला जामीन नाकारला; अनेक चोरी प्रकरणांत सहभाग

Margao News : आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : मडगाव, घरफोडी प्रकरणातील आरोपी पॉलसिंग चिमा याला मडगावच्‍या न्‍यायालयाने शुक्रवारी जामीन नाकारला. ५० लाख रुपयांच्‍या एका चोरीप्रकरणी चिमा याला फातोर्डा पोलिसांनी सर्वप्रथम अटक केली होती.

३ जानेवारी रोजी पॉलसिंग चिमाच्‍या विरोधात जामीन अर्जावर मडगावच्‍या कनिष्‍ठ न्‍यायालयात सुनावणी झाली आणि युक्तिवाद झाला. फातोर्डा पोलिस स्‍थानकात नोंद करण्‍यात आलेल्‍या गुन्‍हा (क्र. ७७/२०२३) प्रकरणी भादंसंच्‍या ४५४, ४५७, ४८ कलमाखाली त्‍याला अटक केली होती. त्‍यानंतर या आरोपीला न्‍यायालयीन कोठडीत ठेवण्‍यात आले होते.

फातोर्डा पोलिस स्‍थानकात नोंद करण्‍यात आलेल्‍या दुसऱ्या एका चोरी प्रकरणासंबंधी (८१/२०२३) त्‍याला फातोर्डा पोलिसांनी न्‍यायालयीन कोठडीतून पुन्‍हा ताब्‍यात घेऊन भादंसंच्‍या ४५४, ४५७, ४८० कलमाखाली अटक केली होती.

आरोपी चिमाच्‍या जामीन अर्जाला फातोर्डा पोलिसांनी जोरदार विरोध केला. गोव्‍यात अनेक ठिकाणी झालेल्‍या चोऱ्यात त्‍याचा हात असल्‍याचे तपास यंत्रणेने न्‍यायालयाच्‍या निदर्शनाला आणून दिले. मडगाव, केपे, डिचोली या शहरात झालेल्‍या चोरी प्रकरणात हात असल्‍याचे पोलिसांच्‍या निदर्शनाला आलेले आहे.

फातोर्डा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीतील अनेक चोऱ्या प्रकरणात या आरोपीचा हात आहे. त्‍याला जामिनावर सोडल्‍यास तो आणखी चोऱ्या करण्‍याची शक्‍यता आहे. तो आपला स्‍थानिक पत्ता देण्‍यास अपयशी ठरलेला आहे.

अशा परिस्‍थितीत आरोपी पॉलसिंग चिमा फरारी झाल्‍यास त्‍याला शोधून काढणे कठीण होऊन बसेल. त्‍यामुळे त्‍याचा जामीन अर्ज फेटाळून लावावा, अशी फातोर्डा पोलिसांनी न्‍यायालयाकडे विनंती केली.हा आरोपी पोलिस कोठडीत आहे.

तपासासाठी निर्णय

प्रस्‍तुत गुन्‍ह्यासंबंधातील चोरीचा ऐवज जप्‍त करायचा आहे. त्‍यामुळे तपासासाठी तो तपास यंत्रणेला हवा असल्‍याचे फातोर्डा पोलिसांनी न्‍यायालयाच्‍या नजरेला आणून दिले होते.

या घडीला या आरोपीची पोलिसांना तपासासाठी गरज आहे. त्‍यामुळे जामीन अर्ज फेटाळण्‍यात येत असल्याचे मडगावच्‍या प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी टेसी मास्‍कारेन्‍हास यांनी शुक्रवारी दिलेल्‍या आदेशात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lingayat History: 'कलचुरी राजाचा मुख्य मंत्री असलेला बसव', यल्लम्मा आणि लिंगायत पंथाचा इतिहास

King Title Reveal: 'सौ देशों में बदनाम...' शाहरुख खानच्या वाढदिवशी 'किंग'चा दमदार लूक रिलीज; VIDEO तूफान व्हायरल

Tulsi Vivah: सात म्हार्गाची माती हाडा, तियेची होटी भरा! गोव्यातील तुलसीविवाह ‘व्हडली दिवाळी’

50 Years Of Emergency: भारतीय आणीबाणीची 50 वर्षे

2000 Note: 2000 च्या नोटांबाबत RBI कडून मोठी अपडेट, अजूनही 5817 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात

SCROLL FOR NEXT