Tourist Baga Accident Death Dainik Gomantak
गोवा

Tourist Accident Death: सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आले होते गोव्याला, पण... स्कूटर- कारच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी

Goa Baga Tourist Accident: गोव्यातील बागा रोडवर पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चंदीगड येथील एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Sameer Amunekar

गोव्यातील बागा रोडवर पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चंदीगड येथील एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. स्कूटर आणि एर्टिगा टॅक्सी यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मृत पर्यटकाची ओळख 55 वर्षीय संजय जुनेजा अशी झालीय.

पहाटे 4.30 वाजता घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, बागा रोडवर पहाटे सुमारे 4.30 वाजता फॅसिनो स्कूटर आणि एर्टिगा टॅक्सीची जोरदार समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कूटरवरील संजय जुनेजा यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला मुलगा कुणाल यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलाला GMCमध्ये हलवले

अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुणाल याला पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज (GMC) येथे हलवण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅक्सी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले

या प्रकरणात कळंगुट पोलिसांनी एर्टिगा टॅक्सी चालकाला ताब्यात घेतले आहे. चालकाची चौकशी करण्यात येत असून अपघातामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही वाहनांचा वेग, रस्त्याची परिस्थिती आणि अपघाताच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

पर्यटकाच्या मृत्यूने हळहळ

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या चंदीगडच्या कुटुंबावर या दुर्घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे, तर गंभीर जखमी असलेल्या मुलाच्या प्रकृतीकडे कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे. कळंगुट पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू असून तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT