

पणजी: ३ कोटींची आर्थिक फसवणूक आणि मनी लाँडरिंग प्रकरणात विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती विजया आंब्रे यांनी ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा आदेश दिला आहे.
कृष्ण कुमार उर्फ विजय कुमार जयस्वाल (वय ४५ वर्षे, नवी दिल्ली), रश्मी जयस्वाल (वय ३७ वर्षे, नवी दिल्ली), युदिवो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, युदिवो लाइफ केअर प्रा. लि. आणि युदिवो प्रॉपर्टी ॲण्ड प्रॉफिट्स प्रा. लि. यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहे. कृष्ण कुमार या कंपनीचे संचालक असल्याने त्यांच्यावर हा आरोप प्रतिनिधी म्हणून निश्चित केला आहे.आर्थिक गुन्हे शाखेने ८ जून २०२२ रोजी विजय कुमार जयस्वालवर गुन्हा नोंदविला.
सेबीच्या नोंदणीशिवाय घेतल्या ठेवी
संशयितांनी सेबी किंवा आरबीआयची कोणतीही परवानगी अथवा एनबीएफसी नोंदणी न करता जनतेकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या. सुरुवातीचे तीन-चार महिने किरकोळ परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. मात्र, त्यानंतर पैसे देणे बंद केले. गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितले असता त्यांना गंभीर परिणामांच्या धमक्या देण्यात आल्या. सुमारे ३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.