Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Goa vs Jammu Kashmir: गोव्याला १९ वर्षांखालील पुरुष विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत एलिट क गटात सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.
Goa vs Jammu Kashmir
Under 19 CricketDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्याला १९ वर्षांखालील पुरुष विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत एलिट क गटात सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. चंडीगड येथील ताऊ देवीलाल स्टेडियमवर त्यांना जम्मू-काश्मीरने ६९ धावांनी नमविले.

जम्मू-काश्मीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २९४ धावा केल्या. नंतर गोव्याचा डाव ४५.२ षटकांत २२५ धावांत संपुष्टात आला. गोव्यातर्फे आफ्रिद राजाक्कनावर (नाबाद ८२, ७३ चेंडू, ३ चौकार, २ षटकार) व कर्णधार आराध्य गोयल (५० धावा, ६७ चेंडू, ७ चौकार) यांनी झुंझार अर्धशतके ठोकली.

Goa vs Jammu Kashmir
Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

संक्षिप्त धावफलक : जम्मू-काश्मीर : ५० षटकांत ९ बाद २९४ (शौर्य चौहान ३८, अर्जुन शर्मा ५६, आशुतोष महाजन ४०, शिवा ठाकूर ४९, मणित्व्या शर्मा ४३, चिगुरुपती व्यंकट १०-१-४९-१, शमीक कामत ९-०-६२-२, मिहीर कुडाळकर १०-०-४१-१, स्वप्नेश नाईक ४-०-१८-१, आदित्य कोटा ५.२-०-३१-१, मोहित यादव १-०-७-०, आफ्रिद राजाक्कनावर ९-०-६०-२, आराध्य गोयल १.४-०-१७-०) वि. वि. गोवा : ४५.२ षटकांत सर्वबाद २२५ (अदीप मिस्कीन ३, विनीत कामत २५, आराध्य गोयल ५०, स्वप्नेश नाईक ९, आफ्रिद राजाक्कनावर नाबाद ८२, मोहित यादव ६, चिगुरुपती व्यंकट २३, आदित्य कोटा ५, विशेष बेहल १०, मिहीर कुडाळकर ८, शमीक कामत ०, केतन सिंग ९.२-०-४१-४, मणित्व्या शर्मा ७-०-४२-२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com