Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा पोलिसांचे कारनामे पुन्‍हा एकदा चर्चेत! आठ महिन्‍यांत ४ पोलिस अटकेत, ११ निलंबित

Goa Police: हणजूण पोलिस स्‍थानकावर ड्युटी मास्‍तर म्‍हणून काम करणारा पोलिस शिपाई रामा परब याच्‍यावर झालेली निलंबनाची कारवाई मात्र वादग्रस्‍त ठरली

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोवा पोलिसांच्‍या ‘आयआरबी’ विभागात काम करणारा पोलिस शिपाई निकेश च्‍यारी याच्‍याकडून अन्‍य एका पोलिसाच्‍या दोन वर्षांच्‍या मुलाचे अपहरण करण्‍याचा झालेला प्रयत्‍न आणि त्‍यानंतर त्‍याला झालेली अटक.

तसेच मडगावातील ज्‍येष्‍ठ वकील अॅड. जयंत प्रभू यांना आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्‍याच्‍या आरोपाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक अनुष्‍का परब आणि इतर पोलिसांवर नोंद झालेला गुन्‍हा. या दोन प्रकरणांनी गोवा पोलिसांचे कारनामे पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘काळे डाग’ असलेलीच पोलिसांची प्रतिमा पुन्‍हा एकदा दिसून आली आहे.

१ जानेवारी ते ३१ ऑगस्‍ट २०२४ या आठ महिन्‍यांच्‍या कालावधीत एका पोलिस निरीक्षकासह चार पोलिसांना वेगवेगळ्‍या गुन्‍ह्यांत अटक करण्‍यात आली आहे. तर, एका निरीक्षकासह एकूण दहा पोलिसांना वेगवेगळ्‍या कारणांसाठी निलंबित करण्‍यात आले. यात सेवेत असताना काम करतानाचा हलगर्जीपणा हे कारण तर आहेच शिवाय भ्रष्‍टाचारासारख्‍या गंभीर गुन्‍ह्याखालीसुद्धा पोलिसांना कारवाईस सामोरे जावे लागले आहे.

अपहरण प्रकरणात पोलिस शिपायाला अटक करण्‍याची घटना दोन दिवसांपूर्वी कोरगाव-पेडणे येथे घडली. आयआरबी पोलिसात काम करणारा निकेश च्‍यारी याने आपलाच वर्ग मित्र असलेला दुसरा आयआरबीचा पोलिस शिपाई कमलेश वेंगुर्लेकर याच्‍या लहान मुलाचे अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न केला. तर दुसऱ्या प्रकरणात मडगावच्‍या महिला पोलिस उपनिरीक्षक अनुष्‍का परब यांनी ज्‍येष्‍ठ नागरिक असलेले ॲड. जयंत प्रभू यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले. या दोन्‍ही प्रकरणांची सध्‍या चौकशी सुरू आहे.

रामा परब याचे वादग्रस्‍त निलंबन

पोलिसांची वाढती निलंबने हा चर्चेचा विषय बनला आहे. हणजूण पोलिस स्‍थानकावर ड्युटी मास्‍तर म्‍हणून काम करणारा पोलिस शिपाई रामा परब याच्‍यावर झालेली निलंबनाची कारवाई मात्र वादग्रस्‍त ठरली. कर्णकर्कश आवाजात सुरू असलेल्‍या संगीत पार्ट्यां‍विषयी तक्रारी येऊनही काहीच कारवाई न केल्‍याचा ठपका ठेवून त्‍याला १५ ऑगस्‍ट रोजी निलंबित करण्‍यात आले. वास्‍तविक आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना एस्‍कॉर्ट न दिल्‍याच्‍या रागातून ही कारवाई करण्‍यात आल्‍याचा आरोप झाला होता.

पोलिसांमध्‍ये भिनलेला बेमुर्वतपणा व भ्रष्‍टाचार यास फक्‍त पोलिसच नव्‍हेत तर सरकारही तेवढेच जबाबदार आहे. किनारपट्टी भागातील व्‍यावसायिकांकडून पोलिस पाच लाखांपासून पन्नास लाखांपर्यंत हप्‍ता घेतात, हे सर्वांना माहीत आहे. मात्र त्‍यांच्‍यावर कडक कारवाई कधीच केली जात नाही. आतापर्यंत ज्‍या कारवाया झाल्‍या आहेत, त्‍या फक्‍त डोळ्‍यांना पाणी लावण्‍यापुरत्‍या असेच नाईलाजाने म्‍हणावे लागेल.
ॲड. अमित पालेकर (‘आप’चे राज्‍य अध्‍यक्ष)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

Jamun Tree: सीतामाईच्या शोधात सह्याद्रीमध्ये रामाने मिठी मारलेला कच्छ, राजस्थान सोडून भारतभर आढळणारा 'जांभूळ वृक्ष'

Virat Kohli: दोन डकनंतर कोहलीचा पलटवार, सचिनचा 'सर्वात मोठा विक्रम' मोडत बनला व्हाईट-बॉलचा king

गोव्यात 'फर्जी' रुक्सुद्दीन सुलतान; लाखो बनावट अमेरिकी डॉलर्स छापल्याप्रकरणी भटकळ पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT