Babush Monserratte celebrates Holi in Panjim Dainik Gomantak
गोवा

रंग बरसेच्या तालावर बाबूशने धरला ठेका

मतभेद विसरुन पणजीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं बाबूश मोन्सेरात यांचं आवाहन

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात सर्वत्रच होळीची धूम पाहायला मिळते आहे. राजधानी पणजीतही सर्वसामान्य नागरिकांसह नेत्यांनी घराबाहेर पडत होळीचा मनमुराद आनंद लुटला. पणजीचे भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही आझाद मैदानावर जात रंग खेळत गाण्यांवर ठेका धरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याचं चित्र आहे.

बाबूश मोन्सेरात यांनी होळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छाही दिल्या. पणजीतील (Panjim) जनतेने मतभेद विसरुन राजधानीच्या विकासासाठी एकत्र यावं असं आवाहनही पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केलं आहे. यावेळी बाबूश यांनी पणजीतील आझाद मैदानावर नागरिकांमध्ये मिसळत धुळवड खेळली. इतकंच नाही तर जल्लोषात सामील होत त्यांनी गाण्यांच्या तालावर ठेकाही धरला.

दरम्यान गोवा विधानसभा निवडणुकीनंतर (Goa Election) बाबूश मोन्सेरात यांनी नाराजी व्यक्त केली होती. पणजीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आपला प्रचार केला नाही, तसंच आपल्याला साथ दिली नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. पणजीत मनोहर पर्रीकरांचा मुलगा उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचा बाबूश मोन्सेरात यांच्याकडून निसटता पराभव झाला होता. मात्र जिंकूनही बाबूश यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. यासोबतच मगोपला सोबत घेण्यावरुनही बाबूश यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पहिल्यांदाच बाबूश लोकांमध्ये मिसळताना दिसले. मतभेद विसरुन एकत्र काम करण्याचं आवाहन बाबूश यांनी नागरिकांना केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

SCROLL FOR NEXT