साळमध्ये गडे उत्सवाची तयारी जोरात

आजपासून प्रारंभ: 20 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन
साळ मध्ये प्रसिद्ध गडे उत्सवाची तयारी जोरदार
साळ मध्ये प्रसिद्ध गडे उत्सवाची तयारी जोरदारDainik Gomantak
Published on
Updated on

साळ: शिमग्यातील गडेत्सव डिचोली तालुक्यातील पिळगाव, कुडणे, आमोणे, बोर्डे - डिचोली व साळ येथे उत्सव साजरा होतो. काही ठिकाणी दिवसा, काही ठिकाणी काळ्याकुट्ट भयाण रात्री, निस्तब्ध पण साळ येथील गडेत्सव सगळ्यात वेगळा, रात्रीचा असला तरी होळी व मंदिर परिसरात विद्युत रोषणाईचा लखलखाट असतो. आजपासून हा उत्सव 20 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांसह होणार आहे. धुमासे, कासारपाल, दोडामार्गमार्गे येणाऱ्या भाविकांनी रात्री 10.00 च्या आत साळमध्ये प्रवेश करावा, असे साळ देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत व सचिव विशाल परब यांनी कळविले आहे.

साळ मध्ये प्रसिद्ध गडे उत्सवाची तयारी जोरदार
वास्कोत होलिकोत्सव उत्साहात

साळ येथील उत्सवाचा शिरोमणी असलेला गडे उत्सव हा गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध आहे. या उत्सवासाठी आज सोनारभाट - लाडफे येथील सौ. सुचित्रा व सुरेश राजाराम नाईक यांच्या बागायतीतील होळी 60 फूट लांब कोकम (भीरण) झाडांची असून साळ गडे, महाजन, नागरिक व सोनारभाट, लाडफे, खैट येथील युवकांनी होळी आणण्यासाठी मदत केली. या खेळाची मर्यादा पहाटेपर्यंत म्हणजे चार साडेचार वाजेपर्यंत असते. त्या वेळेतच खेळ आटोपला जातो. घोडे मोडणी झाल्यानंतर रात्रीच्या चवाटेश्वर मंदिरात तीर्थ देऊन उत्सवाचीसांगता होतै.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com