babush monserrate Dainik Gomantak
गोवा

Goa Bhumiputra Bill: वादग्रस्त ठरलेले भूमिपुत्र विधेयक हटवणार : महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात

दैनिक गोमन्तक

Goa Assembly Monsoon Session 2023: दोन वर्षांपूर्वी राज्यात वादातीत ठरलेले भूमिपुत्र विधेयक हटविण्यासाठी महसूल खात्याने प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती महसूलमंत्री आतानासियो (बाबूश) मोन्सेरात यांनी दिली.

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी महसूल खात्याच्या मागण्या आणि कपात सूचनांवर उत्तर देताना मोन्सेरात बोलत होते.

२०२१ मध्ये भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक मांडल्यानंतर त्याला राज्यातून जोरदार विरोध झाला. बराच काळ राज्यात राहणाऱ्या लोकांना स्थानिक म्हणून अधिकार देणारे हे विधेयक होते. त्यास त्यावेळी विरोधी आमदारांनी जोरदार विरोध केला होता.

गेल्यावर्षी भाजपवासी झालेले आणि तत्कालीन ८ काँग्रेसच्या आमदारांनीही या विधेयकाला विरोध केला होता. ते विधेयक हटविण्यासाठी प्रस्ताव ठेवल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितल्याने आता या विधेयकावरून उठलेल्या त्या वादावर पडदा पडला आहे.

कुळ-मुंडकारांची १४९१ प्रकरणे निकाली

मोन्सेरात आपत्ती व्यवस्थापनावर म्हणाले, राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या १९० दाव्यांप्रकरणी ३२ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिलेली आहे. मुंडकारांची जमीन असलेली सुमारे १४९१ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना कुळ-मुंडकारांची प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आत्तापर्यंत उत्तर गोव्यातील ९७८ आणि दक्षिण गोव्यातील ५१३ प्रकरणे निकाली निघाली आहेत.

९७८ उत्तर गोवा

५१३ दक्षिण गोवा

३२ लाखांची नुकसान भरपाई

जमिनीचे सर्व्हे नंबर ‘आधार’ला जोडणार

मालमत्तेचा तथा जमिनीचा सर्व्हे नंबर आता आधारकार्डशी जोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे मालकी कोणाची आहे, हे समजणे सहज शक्य होणार आहे. म्युटेशनचे दावे निकाली काढण्यासाठी जलद प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT