Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

कोमुनिदाद दुरुस्तीनंतर मुलींनाही हक्क : महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात

दुरुस्ती प्रस्ताव अद्याप निश्चित नाही

दैनिक गोमन्तक

पणजी : कोमुनिदाद संहितेच्या कायद्यात वेळेनुसार बदल होण्याची गरज आहे. मुलांबरोबर मुलींनाही समान हक्क देण्याच्या दृष्टीने कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव असून अजून तो निश्‍चित झालेला नाही. येत्या अधिवेशनात ही दुरुस्ती येण्याची शक्यता नाही. कोमुनिदाद कायद्यात दुरुस्ती झाल्यास मुलींनाही समान हक्क मिळेल, असे मत महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केले.

कोमुनिदाद जमिनीवर कायद्यात फक्त मुलांनाच हक्क आहे. तो मुलींना मिळत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होतो. एखाद्याला जर मुलीच असतील, तर कोमुनिदादचा हक्क त्याच्या वारसाला मुलगी म्हणून नाकराणे योग्य नाही. त्यामुळे ही दुरुस्ती आणण्याची गरज आहे. सध्या हा दुरुस्ती प्रस्तावावर सूचना मागवण्यात येत असल्याने तो प्रलंबित आहे, असे मंत्री मोन्सेरात म्हणाले.

सरकारने कोमुनिदाद संहितेच्या कायद्यात आणखी दुरुस्ती विधेयक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याबाबत मला माहीत नाही व जेव्हा तो मंत्रिमंडळासमोर येईल तेव्हा समजेल. या दुरुस्तीचा प्रस्ताव मी मंत्रिपदाचा ताबा घेण्यापूर्वी आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोमुनिदादने अतिक्रमण केलेल्यांविरुद्ध कारवाई केली नाही व ज्यांनी आता तेथे बांधकामे केली आहेत त्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध होऊन हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप केला जात आहे, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sankashti Horoscope: गणपतीच्या कृपेने दूर होतील सर्व कष्ट, 'या' राशींना होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

Goa Live Updates: केरये-खांडेपार अपघातात स्कुटर चालक जखमी

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT