Vijai Sardesai|Babush Monserratte Dainik Gomantak
गोवा

Goa LDC Recruitment Scam: 'पुरावे एकत्र करण्याचे काम सुरूच'; मोन्सेरात यांच्या मागणीवर सरदेसाईंचे प्रत्युत्तर

LDC Recruitment Corruption: भाजपचेच नेते बाबूश यांच्या मागे ठामपणे उभे राहिले नसल्याने सरदेसाई यांनी केलेल्या आरोपात तथ्य असावे असा कयास मानला जात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa LDC Recruitment Fraud

पणजी: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक भरतीसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप नुकताच आमदार विजय सरदेसाई यांनी केला होता. त्यावर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आता सरदेसाई यांनी पुरावे द्यावेत, आपणाकडे देता आले नाही, तर ते मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रालय परिसरात पत्रकारांनी त्यांना अडविले असता त्यांनी वरील उत्तर दिले. भाजपच्या कोअर कमिटीतही म्हणे लिपीक पदावरून बाबूश आक्रमक झाले होते. बाबूश आक्रमक होण्यामागे आमदार सरदेसाई यांनी केलेल्या आरोपांची किनार होते. या प्रकरणी बाबूश एकाकी पडले असले तरी दुसऱ्या बाजूला आमदार मायकल लोबो यांनी बाबूश यांना क्लिनचीट दिली आहे.

भाजपचेच नेते बाबूश यांच्या मागे ठामपणे उभे राहिले नसल्याने सरदेसाई यांनी केलेल्या आरोपात तथ्य असावे असा कयास मानला जात आहे. त्यामुळेच बाबूश यांनी सरदेसाई यांच्याकडे पुरावे मागितले आहेत.

...त्यावेळी कुठे होते पुरावे? सरदेसाई

कारकून भरती घोटाळा प्रकरणात पुरावे एकत्र करण्याचे आमचे काम सुरूच आहे. हे सर्व पुरावे ज्या कुणाकडे सादर करायचे आहेत, त्यांच्याकडे ते सादर करू, अशी प्रतिक्रिया बाबूश मोन्‍सेरात यांनी दिलेल्या आव्हानाबद्दल विजय सरदेसाई यांनी दिली आहे. ‘पुरावे दाखवा, असे जे महसूलमंत्री मोन्‍सेरात म्हणतात ते फक्त लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी. ही भरती प्रक्रिया एवढी का लांबवली गेली? परीक्षेच्या निकालात फेरफार कुणी केले, यावर ते का बोलत नाहीत! मुख्य म्हणजे त्यांनी हे आरोप नाकारलेलेही नाहीत. आज मला पुरावे द्या म्हणणाऱ्या मोन्‍सेरात यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भरती प्रक्रियेत पैशांची देवाण घेवाण झाली, असा आरोप केला होता, त्यावेळी त्यांनी कोणते पुरावे सादर केले होते आणि ते कुणाकडे सादर केले, असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT