Babush Monserrate Acquittal Dainik Gomantak
गोवा

Goa Sexual Assault Case: बाबूश मोन्सेरात यांची 9 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; 2016 च्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयाचा दिलासा

Babush Monserrate Acquittal : हे प्रकरण 2016 मधील असून मोन्सेरात यांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Manish Jadhav

पणजी: गोव्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या 2016 मधील एका लैंगिक छळाच्या प्रकरणातून पणजीचे भाजप आमदार आणि ज्येष्ठ नेते बाबूश मोन्सेरात यांची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मेरशी येथील विशेष न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल देताना या प्रकरणातील सहआरोपी रोझारियो उर्फ रोझी फेरोस यांचीही निर्दोष मुक्तता केली. तब्बल नऊ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागल्याने मोन्सेरात आणि त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे प्रकरण 2016 मधील असून मोन्सेरात यांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान आणि न्यायालयीन प्रक्रियेत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. मात्र, पुराव्यांचा अभाव आणि अन्य तांत्रिक बाबींमुळे न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले. निकालाच्या वेळी न्यायालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

या खटल्यादरम्यान अनेक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आणि नंतरही मोन्सेरात यांच्यावर या प्रकरणामुळे विरोधकांकडून वारंवार टीका केली जात होती. मोन्सेरात यांनी सुरुवातीपासूनच आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि ही आपल्याला राजकीय षड्यंत्रात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला होता. आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांच्यावरील आरोपांचे मळभ दूर झाले आहे.

बाबूश मोन्सेरात हे गोव्यातील (Goa) एक वजनदार नेते मानले जातात. त्यांच्या निर्दोष मुक्ततेमुळे आगामी राजकीय समीकरणांवरही याचा परिणाम होऊ शकतो. या निकालावर मोन्सेरात यांनी प्रतिक्रिया देताना न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आणि सत्याचा विजय झाला असल्याचे म्हटले. या निर्णयामुळे पणजी मतदारसंघात त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याप्रकरणी; न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT