Goa Sexual Assault: 23 वर्षीय तरुणानं अल्पवयीन मुलीला बनवलं शिकार! मायणा-कुडतरीतील संतापजनक प्रकार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Maina Curtorim Sexual Assault Case: मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Maina Curtorim Sexual Assault Case
Sexual Assault CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या संतापजनक प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर गुन्ह्याखाली पोलिसांनी रेसमण्ड कार्दोज नावाच्या 23 वर्षीय संशयितावर गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा संशयित गेल्या पाच वर्षांपासून पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. अत्याचार केल्यानंतरही तो थांबला नाही, त्याने पीडितेला धमकावण्याचे सत्र सुरुच ठेवले. पीडितेच्या एका मित्राचे, कॉनार्ड फर्नांडिसचे नाव वापरुन त्याने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले आणि त्या माध्यमातून तो पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता.

Maina Curtorim Sexual Assault Case
Jobs In Goa: महत्वाची बातमी! 8वी ते 10वी शिक्षित युवकांसाठी गोवा सरकारची नोकरीची हमी; राबवणार कौशल्य विकास प्रशिक्षण योजना

या नराधमाने पीडितेकडे नग्न फोटो आणि व्हिडिओंची मागणी केली होती. जर तिने त्याचे ऐकले नाही, तर पोर्न वेबसाइटवरील अश्लील व्हिडिओ किंवा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो सातत्याने देत होता. संशयिताच्या या सततच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर त्या मुलीने हिंमत एकवटली आणि सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. आपल्या मुलीवर ओढवलेला हा भयंकर प्रसंग ऐकून कुटुंबीयांनी तात्काळ मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि रीतसर तक्रार दाखल केली.

Maina Curtorim Sexual Assault Case
Goa Cyber Crime: गुंतवणूकीतून ज्यादा परताव्याचं आमिष, गोव्यातील एकाला 67 लाखांचा गंडा; केरळच्या भामट्याला बेड्या

पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संशयित रेसमण्ड कार्दोजवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 319, 78, 351 सह गोवा बाल कायदा कलम 8 (2) आणि बाल संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम 7 अंतर्गत विविध गुन्हे नोंदवले आहेत. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनल गावकर या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पाच वर्षांपासून चाललेला हा छळ आणि सायबर गुन्हेगारीचा वापर करुन दिलेली धमकी, या सर्व बाबी आता तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा आणि सोशल मीडियाच्या (Social Media) गैरवापराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com