Babu Azgaonkar will not be allowed to campaign in Pernem constituency during Assembly elections  Dainik Gomantak
गोवा

स्‍वार्थी राजकारणामुळे पेडणे मतदारसंघातील शेतकऱ्यांचा बळी

धारगळ शेतकरी संघर्ष समितीकडून टीका : ‘बाबूं’ना निवडणूक प्रचाराला रोखणार

दैनिक गोमन्तक

पेडणे: मोपा ते धारगळ या लिंक रोडसाठी 900 कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, भूमिपुत्र शेतकऱ्यांना एक पैसाही दिला नाही. पूर्वजांनी कष्‍टाने उभारलेली उत्‍पन्न देणारी बागायती, शेतजमीन प्रकल्‍पासाठी हिरावून घेतल्‍याने आर्थिक संकट ओढवले आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आपल्या स्वार्थासाठी पेडणे मतदारसंघातील शेतकऱ्यांचा बळी दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात त्‍यांना प्रचारासाठी फिरू देणार नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन यापुढे तीव्र करू, असा इशारा धारगळ शेतकरी संघर्ष समितीचे निमंत्रक भारत बागकर यांनी दिला.

दाडाचीवाडी - धारगळ येथे धारगळ शेतकरी संघर्ष समितीतर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी श्री. बागकर बोलत होते. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील पीडित शेतकऱ्यांचा प्रश्न आमदार रोहन खंवटे यांनी विधानसभेत उपस्थित केल्यामुळे त्यांचे समितीतर्फे अभिनंदन, तर विधानसभेत खोटी माहिती दिल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा निषेध करण्यात आला. यावेळी समितीचे निमंत्रक प्रशांत शिरोडकर, रमाकांत तुळसकर, लक्ष्मण राऊळ, संदीप साळगावकर, शामसुंदर मयेकर, महेश तुळसकर, प्रकाश पाळयेकर, शिवाजी राऊळ, कृष्णा कानोळकर, सागर कानोळकर, प्रताप कानोळकर, राजन कोनाडकर आणि प्रताप यशवंत कानोळकर यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

पेडणे तालुक्यात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ परीसरातील शेतकऱ्यांनी आपल्या कसदार जमिनी विमानतळासाठी दिल्या. मात्र, सरकारने त्यांना अद्याप मोबदला दिला नाही. उलट सरकारने कायदेशीर कटकटी करून शेतकऱ्यांना संकटात लोटले आहे. त्यामुळे जमिनीचा मोबदला मोपा पीडितांना मिळणे अवघड होत आहे. यावेळी रमाकांत तुळसकर, प्रशांत शिरोडकर, महेश तुळसकर, अंकुश आरोंदेकर, शामसुंदर राऊळ यांनी आपल्या व्यथा पत्रकारांसमोर मांडल्या आणि जमिनीचा मोबदला न देता त्या बदल्यात सरकारने आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

...तर सामूहिक आत्‍महत्‍या करू : मयेकर

शामसुंदर मयेकर म्‍हणाले, मोपा विमानतळ परिसरातील सुमारे 27 हजार चौ. मी. जमिनीतील उत्पन्न देणारी काजूची झाडे, तसेच अन्य झाडे कापून चार वर्षे झाली, तरीही मोबदला दिलाच नाही. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गुरांचे गोठे पाडण्‍यात आले. काजूची झाडे कापल्याने उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उपाशी मरण्यापेक्षा मी कुटुंबासह मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर जाऊन आत्महत्या करणार, असा इशारा त्रस्त शेतकरी शामसुंदर मयेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मोबदला दिलाच नाही

धारगळ ते मोपा विमानतळ सुमारे 7 कि. मी. अंतर असलेल्या लिंक रोडसाठी 900 कोटी एवढा निधी मंजूर केला. मात्र, पीडित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी सरकारजवळ पैसा नाही. त्‍यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळल्‍याचे भारत बागकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT