आता प्रत्येक घरात मिळणार एक 'नोकरी'; बाबू आजगावकर

पेडणे मतदार संघात होवू घातलेल्या प्रकल्पातून अनेक बेरोजगार युवकांना रोजगारांच्या संधी मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar)
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) Dainik Gomanatak
Published on
Updated on

मोरजी : पेडणे मतदार संघात होवू घातलेल्या प्रकल्पातून अनेक बेरोजगार युवकांना रोजगारांच्या संधी मिळणार आहे. याच प्रकल्पावर डोळा ठेवून आपले विरोधक ज्यातील एक ड्रग्स विकणारा आणि दुसरा टोप्या घालणारे उमेदवार सध्या पैशाची आमिषे दाखवून आपल्याविरोधात अपप्रचार करत आहे, पैसा घालून त्यातून नंतर करोडो रुपयांची माया जमवण्यासाठी ते राजकारण आपला धंदा बनवतील अश्या मतलबी उमेदवारांना थारा देवू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी वजरी गावातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सभेत नागझर येथे केले.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar)
दिवाळीनंतर गोव्याच्या राजकीय स्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाणार
शेकडो कार्यकर्त्यांच्या सभेत;बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar)
शेकडो कार्यकर्त्यांच्या सभेत;बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar)Dainik Gomanatak

यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, हसापुर सरपंच संतोष मळीक, वजरी सरपंच करुणा नाईक, उपसरपंच कलंगुटकर, सुदामा परब, भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस, अशोक कामत, युवा अध्यक्ष मंदार परब आदी उपस्थित होते.

वजरीसाठी सर्व काही.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी वझरी गावातील असंख्य कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना आज पर्यंत वझरी गावातील नागरिकांनी आपल्याला पूर्ण पाठींबा दिला, काही विरोधका वजरीत येवून धाल्याचा मांड आपण केला त्याची दुरुस्ती करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याला पंचा पासून सरपंच केले सत्कारासाठी पैसा खर्च केला त्याच्या नवऱ्याला सरकारी नोकरी दिली त्याच बाईने पाठीत खंजीर खुपसून आपल्यावर आता तीच बाई टीका करते. तिला माहित नाही 99 टक्के वजरीचे जनता आपल्यासोबत आहे हे, आज पुन्हा एकदा सभेत दाखवून दिले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केला .

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले कि आगामी निवडणुकीत आपण केवळ बेरोजगार युवकांना नोकऱ्या त्याही प्रत्येक घरात एक नोकरी देण्याचा प्रयत्न करणार, शिवाय वझरी गावाच्या जमनिचा विषयी कायम स्वरूपी सोडवणार असल्याचे सांगितले.

नवीन उमेद्वारापासून मतदारांनी सावध रहायला हवे असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar)
मगोपने भाजप युतीला दाखवला ठेंगा

यावेळी मगोचे केंद्रीय समितीचे सदस्य राघोबा गावडे, माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई, पंच गुणाजी ठाकूर, पंच प्रवीण वायगणकर, माजी सरपंच अश्वेता मांद्रेकर, माजी पंच उदय मांद्रेकर, पंच महादेव हरमलकर, माजी सरपंच सेरेफिना फर्नांडीस, दयानंद मांद्रेकर, वंदना शेटगावकर, नाना उर्फ नारायण सोपटे केरकर लक्ष्मि च्यारी, व नवीन मतदार मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी नवीन मतदारांनी आम्ही आमचे पहिले मत जीत आरोलकर यांनाच घालणार असल्याचे सांगून नवीन मतदारांनी जीतला मतदान करण्याचे आवाहन केले. जीत आरोलकर सारखा नेता विकास करू शकतो असे सांगितले. पार्से येथील वयोवृद्ध महिला लक्ष्मी च्यारी यांनी मनोगत व्यक्त करताना जीत आरोलकर हे आमदार नसतानाही पार्से येथे लोकांच्या आग्रहासाठी मठ बांधून दिला आणि ते आमदार झाल्यानंतर बराच विकास करू शकतात असे च्यारी म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar)
नेव्हल बेस कोचीन ते गोवा नौकानयन मोहिमेस आजपासून प्रारंभ

आपली शेवटची निवडणूक

हि आपली शेवटची निवडणूक असणार आहे, पेडणे मतदार संघातील सर्व बेरोजगार युवकाना रोजगार मिळवून देण्याचे आपले स्वप्न आहे आणि उर्वरित जिवन हे पेडणे मतदार संघासाठी अखेरपर्यंत झिजवणार हि आपली शेवटची निवडणूक असेल शेवटची पुन्हा एकदा संधी द्या असे आजगावकर म्हणाले.

पुन्हा पुन्हा निवडून याल ; जिल्हा सदस्य सीमा खडपे

जिल्हा सदस्य सीमा खडपे यांनी बोलताना पेडणे मतदार संघातून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर परत परत निवडून येणार आहे, हि त्यांची शेवटची निवडणूक नसल्याच मत व्यक्त केले आहे.

यावेळी अनेक नागरिकांनी वझरीसाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे मोठे योगदान आहे, रस्ता नव्हता तिथ रस्ते केले वीज नव्हती तिथ वीज सुरु झाली, आणि आताही ९० टक्के मतदार आजगावकर यांच्याच मागे राहतील असा विश्वास अनेक समर्थकांनी केला .

भावूबीज आणि वाढदिवस मोठी भेट देवूया

काही दिवासात दिवाळी येणार आणि त्यात भाऊबीज असणार शिवाय बाबू आजगावकर यांचा वाढदिवस असणार त्या वाढदिवस आणि भाऊबिजला नागरिकांनी मताचे भेट आणि बहिणी भाऊबिजेच्या रूपाने मताधिक देण्याचा निर्धार करून पुढील निवडणुकीत विजयी करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले.

यावेळी तुळसीदास गावस, संतोष मळीक, मंदार परब, अशोक कामत आदींनी विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com