Trinamool Congress party in goa
Trinamool Congress party in goaDainik Gomantak

‘तृणमूल’च्या ‘त्या’ पोस्टरवरून गोव्यात वादंग

तृणमूल गोव्यात आल्यानंतर काय करू शकते, याचा ‘ट्रेलर’ त्यांनी गोमंतकीयांना दाखवून दिला

पणजी: तृणमूल काँग्रेसच्या ‘गोंयची नवी सकाळ’ या ट्विटर हॅण्डलवरून रविवारी नवे वादंग उठले. या ट्विटमध्ये त्यांनी ममता बॅनजी आपल्या पायातील चपलेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, (PM Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना चिरडत आहेत, अशा आशयाचे एक पोस्टर अपलोड केले आहे. या पोस्टरबाजीमुळे काल दिवसभर समाज माध्यम ढवळून निघाले आणि अनेकांनी तृणमूलच्या या कृत्याची निंदाही केली. टीकेच्या भडिमारानंतर ‘तृणमूल’ने सकाळी 9 वाजता शेअर केलेले ट्विट अखेर मागे घेतले. तृणमूलच्या या कृत्याची भाजपने गंभीर दखल घेतली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

twitter post
twitter posttwitter/@ANewDawnForGoa

यासंदर्भात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना एक महिला पायदडी तुडवत असल्याचे दाखविण्यात आले आहे. हा पंतप्रधांनासह देशाच्या नेत्यांचा अपमान आहे. बंगालमध्ये किती हिंसक वृत्ती आहे याचे उदाहरण यातून मिळते. तृणमूल गोव्यात आल्यानंतर काय करू शकते, याचा ‘ट्रेलर’ त्यांनी गोमंतकीयांना दाखवून दिला आहे. ममता दीदींच्या दादागिरीमुळे बंगालमध्ये गुंडगिरी वाढली आहे. बंगालमध्ये लोकशाही उरलेली नाही. गोव्यात नवी सकाळची स्वप्ने पाहणाऱ्या तृणमूलमुळे बंगालमध्ये रात्रही उरली नाही. बंगालमधील लोक समस्याग्रस्त आहेत. गोमंतकीयांवर ती वेळ येऊ द्यायची नसेल, तर त्यांनी वेळीच सावध व्हायला हवे. आम्ही त्यांना योग्यवेळी उत्तर देऊ.’

Trinamool Congress party in goa
वादग्रस्त कार्डेलिया जहाज पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने तृणमूल काँग्रेस आणि त्यांच्या नेतृत्वाने मूळ रंगरूप उघड केले आहे. देवी श्री शांतादुर्गेच्या आशीर्वादाने गोमंतकीय आकलनात आणि हितासाठी योग्य जाणण्याइतपत ज्ञानी आहेत.

- नरेंद्र सावईकर, माजी खासदार (भाजप)

ट्विटचे उत्तर ट्विटनेच

पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खून, बलात्कार आणि सतावणूक करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने आता गोव्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गोव्यातील जनतेला आणि लोकशाहीलाही संपवविण्याचा त्यांनी अजेंडा आखला आहे. गोव्यातील जनतेच्या हितासाठी आम्ही तृणमूलच्या या हिसंक कृतीचा निषेध करतो, असे भाजपने ट्विट करत उत्तर दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com