Babu Ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

Babu Ajgaonkar: विधानसभा निवडणूक पेडण्यातून लढवणार

Babu Ajgaonkar: अपूर्ण कामे पूर्ण करणार

दैनिक गोमन्तक

Babu Ajgaonkar: आगामी विधानसभा निवडणूक आपण पेडणे मतदारसंघातून लढवणार असल्याचे माजी मुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे येथे ते एका कार्यक्रमाला आले असता पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले की, पेडणे मतदारसंघात मी मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ प्रकल्प हे रोजगार निर्मिती करण्यासाठी आणले. मात्र, रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे तशी झाली नाही. जे आमदार आहेत त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.

या प्रकल्पावर पेडणेकरांना योग्य त्याप्रमाणात स्थान मिळाले नाही. त्यांना स्थान मिळण्यासाठी आणि अपुरे राहिलेले काम पुढे नेण्यासाठी आपण परत पेडण्यात येणार असून आपण पेडणे मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

लोकांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असून अनेक लोक आपल्याला परत पेडण्यात येण्यासाठी आग्रह धरत असल्याचे यावेळी बाबू आजगावकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत चांगले काम करत आहेत. ते योग्य तो न्याय बहुजन समाजातील लोकांना मिळवून देणार याचा आपल्याला विश्वास आहे.

भाजपने आपल्याला पेडण्यातून तिकीट नाकारले आणि मडगाव येथे निवडणूक लढविण्यास सांगितले. पक्षाचा आदेश मानला. पेडणे मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते आता आपण परत येऊन सोडविणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT