मोरजी : भाजपचे आपण काय वाईट केले म्हणून आपल्याला उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागतो, असा सवाल उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केला आहे. मोपा माऊली देवस्थान परिसरात विकास कामाचा शुभारंभ केल्यानंतर आजगावकर यांनी आपली खंत बोलून दाखवली.
आर्लेकर हे ड्रग्स चरस विकणारे असे भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे सांगत होते, आता त्यांचे स्वागत कोण करतो, असाही सवाल करून भाजपला आता सत्ता देण्यापूर्वी त्यांना जाब विचारा असे आवाहन मंत्री आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी केले. मंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना भाजपाने आपल्यावर अन्याय केला त्याचा जाब मतदारांनी विचारावा, त्यासाठी यापूर्वी जसा विश्वास ठेवला, तोच विश्वास याही पुढे ठेवून आपल्याला विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मोपा विमानतळ, आयुष हॉस्पिटल आणि क्रिकेट स्टेडियम या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या नोकरी व्यवसायावर आता अळंबीसारख्या उगवणाऱ्या उमेदवारांचे लक्ष आहे. यापुढे केवळ या प्रकल्पातून पेडणेकरांनाच नोकऱ्या मिळतील याकडे आपले लक्ष आहेत आणि जर आमच्या मतदारसंघातील युवकांवर अन्याय झाला तर आपण कधीच गप्प बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिला.
यावेळी बोलताना सीमा खडपे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी करोडो रुपये खर्च करून मोपा पंचायत क्षेत्राचा विकास बाबू आजगावकर यांनी केला आहे, सरकारी नोकऱ्या (Government Jobs) सर्वांनाच शक्य नाही, परंतु जे प्रकल्प होवू घातले, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतात, त्यासाठी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचाच निवडून आणण्यासाठी संघटित होऊया, असे आवाहनही त्यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.