वास्कोत काँग्रेसच्या प्रचाराला वेग

घरोघरी जात कोपरा प्रचारावर संभाव्य उमेदवाराचा भर
Congress Campaign in Vasco

Congress Campaign in Vasco

Dainik Gomantak

Published on
Updated on

वास्को : दाबोळी मतदार संघात गोवा प्रदेश काँग्रेस समितीने प्रचाराचा वेग धरला आहे. दाबोळी काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विरोधी घरोघरी प्रचारा बरोबर कोपरा बैठकांवर भर दिला आहे.

Congress Campaign in Vasco

काँग्रेसच्या 17 आमदारांपैकी 15 विकले गेले: आप नेते इम्रान हुसेन

गोव्यात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. राज्यातील विविध पक्षाबरोबर इतर राज्यातील पक्षांनी सुद्धा गोव्यात येऊन आपले राजकीय डाव घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काँग्रेसच्या (Congress) बहुतेक विद्यमान आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन इतर पक्षात प्रवेश केला. एवढे होऊनसुद्धा गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने आपला प्रचार राज्यात धूमधडाक्यात सुरु ठेवला आहे. यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Goa Election) काँग्रेस गोव्यात बऱ्यापैकी मजल मारण्याची शक्यता आहे.

Congress Campaign in Vasco

...आता गोवेकरांच्या हाती येणार “अजब गोव्याचे गजब राजकारण”

गोवा प्रदेश काँग्रेस समितीने मुरगाव तालुक्यात बदल घडवण्यासाठी मुरगाव, वास्को (Vasco), दाबोळी व कुठ्ठाळीमध्ये जोरदार प्रचार सुरु केला आहे. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले दाबोळीचे रहिवासी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पक्षाचे कार्य सर्वांपर्यंत घेऊन जाण्यासाठी चंग बांधला आहे.

Congress Campaign in Vasco

सांगेतून विधानसभा निवडणूक लढवणारच: सावित्री कवळेकर

दाबोळी मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार कॅप्टन विरियातो यांनी पक्षाचे कार्य करताना कोपरा बैठका घरोघरी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यात फर्नांडिस यांनी दाबोळी, चिखली, वाडे भागात आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचार सुरू ठेवला आहे. कॅप्टन फर्नांडिस यांनी दाबोळीतील जनतेचा वाढता प्रतिसाद लाभत असल्याचं चित्र आहे. यामुळे दाबोळीत यावेळी काँग्रेसचा हात बाजी मारणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com