Babreshwar Temple |Goa  Dainik Gomantak
गोवा

Babreshwar Temple: कळंगुट पोलिसांची बाबरेश्वराला मानवंदना !

श्री देव बाबरेश्वरच्या जत्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी कळंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत तसेच पोलिस पथकाने श्रीदेव बाबरेश्वरचरणी मानवंदना दिली.

दैनिक गोमन्तक

Babreshwar Temple: पोलिसांनी एकत्र येऊन एखाद्या ग्रामदेवतेला मानवंदना देणे, हे तसे नवीन नाही. मात्र, कळंगुट परिसरातील लोकांनी काल हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवला. कळंगुट-बागा येथील प्रसिद्ध तसेच जागृत श्री देव बाबरेश्वरच्या जत्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली.

पहिल्या दिवशी कळंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत तसेच पोलिस पथकाने श्रीदेव बाबरेश्वरचरणी मानवंदना दिली. या गोष्टीचे काहींना आश्चर्य वाटू लागले आहे. मात्र, आमच्यासाठी हे आत्मबळ वाढविणारे आहे, असे पोलिसांनी सांगितले.

केळ्यांच्या घडांची जत्रा म्हणूनही हा जत्रोत्सव ओळखला जातो. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनीही श्रीदेव बाबरेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

...अन् भाविकही भारावले

श्रीदेव बाबरेश्वरचरणी कळंगुट पोलिसांकडून मानवंदना तसेच सलामीचा रंगतदार कार्यक्रम शनिवारी सकाळी झाला‌. देवस्थानच्या इतिहासात पोलिसांकडून अशा प्रकारची मानवंदना आणि सलामी प्रथमच देण्यात आली.

यावेळी बाबरेश्वर देवाचे भक्तजन आणि भाविकही भारावले. देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत आणि पोलिस पथकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राज्यातील विविध भागांतील जागृत देवस्थाने ही आपणा सर्वांचे राखणदार म्हणून ओळखले जातात. पोलिससुद्धा जनतेच्या संरक्षणाची हमी शिरावर घेऊन कर्तव्य बजावतात. कळंगुट पोलिसांतर्फे श्रीदेव बाबरेश्वरचरणी देण्यात आलेली सलामी ही आम्हा स्थानिक पोलिस दलासाठी आत्मबल वाढविणारी गोष्ट आहे. -दत्तगुरू सावंत, पोलिस निरीक्षक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT