Awareness campaign Gomantak Digital Team
गोवा

Mapusa Goa Can : म्हापशात ‘गोवा कॅन’ कडून ग्राहकांमध्ये जागृती मोहीम

पार्श्वभूमीवर, गोवा कॅनच्या पदाधिकाऱ्यांनी म्हापशातील कदंब बसस्थानकावर ग्राहकांमध्ये जागृती केली

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : गोवा नागरी आणि ग्राहक कृती नेटवर्क (गोवा कॅन) ग्राहक हक्क, तक्रार प्रक्रिया आणि ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या निवारण यंत्रणेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत विशेष मोहीम राबवणार आहे. या पार्श्वभूमीवर, गोवा कॅनच्या पदाधिकाऱ्यांनी म्हापशातील कदंब बसस्थानकावर ग्राहकांमध्ये जागृती केली.

ग्राहक हक्कांविषयी गोवा कॅनने मंगळवारी, म्हापशातील केटीसीएल स्थानकावर जनजागृती केली. या अभियानाचे उद्दिष्ट हे ग्राहकांमध्ये त्यांच्या अधिकारांविषयी जागृती करणे आहे. सध्या मिठाईच्या दुकानांतील ट्रेवर किंवा डब्यांवर मिठाईची एक्सपायरी (मुदतबाह्य) तारीख काय किंवा पदार्थ कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहे, याची तारीख टाकण्याचे निर्देश आहेत. मात्र, अजूनही याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, असे गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स म्हणाले.

बसस्थानकावर केटीसीएलचे कंट्रोल कक्ष आहे. पूर्वी या कक्षाच्या शेजारीच केटीसीएल कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीसाठी खोली होती. मात्र, ही खोली आता बंद करून तिथे दुकान थाटण्यास परवानगी दिली आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांनी कुठे विश्रांती करावी. बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर चहाचे एक बेकायदा दुकान थाटले आहे. हे दुकान पाडण्याचे निर्देश असताना प्रशासकीय यंत्रणा ते मोडण्यास चालढकलपणा करीत आहे.

- रोलंड मार्टिन्स, समन्वयक, गोवा कॅन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT