Goa Accident Death: Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: गिरी येथे स्वयंअपघात भरधाव कारचे दोन तुकडे; चालक जागीच ठार

Goa Accident Death: दुभाजकावरील माडाला ठोकरले

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death: गिरी-म्हापसा येथे महामार्गावर बुधवारी (ता.२९) सायंकाळी झालेल्या भीषण स्वयंअपघातात जुआँव पॅट्रिसिओ डिसोझा (७८, पिळर्ण-बार्देश) यांचा मृत्यू झाला. अल्टो कारवरील त्यांचा ताबा सुटल्याने ती दुभाजकामधील माडावर जोरात आदळली. ही कार इतकी वेगात होती की, माड मोडून पडलाच, शिवाय कारचे दोन भाग होऊन तिचा चक्काचूर झाला.

जुआँव हे पर्वरीहून म्हापशाच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. जुआँव हे जीए-०१-आर-८५६३ या क्रमांकाच्या कारने एकटेच पर्वरीहून म्हापशाच्या दिशेने जात होते. सांगोल्डा जंक्शननंतर काही अंतरावर पोहोचताच त्यांची कार राष्ट्रीय महामार्गावर मधोमध असलेल्या माडावर आदळली.

गिरी येथे भरधाव कारचे दोन तुकडे

ही धडक इतकी जबरदस्त होती की, कारच्या दर्शनी भागात अर्धा घुसला आणि ते मोडून पडला. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर मोडून पडलेला माड बाजूला केला, तर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

दरवाजा तोडून चालकाची सुटका

अपघातानंतर जुआँव कारमध्येच अडकून पडले होते. महामार्गावरील इतर वाहनचालकांनी तातडीने अपघातग्रस्त कारचा दरवाजा मोडून काढून त्यांना बाहेर काढले.

जखमी अवस्थेतच त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पर्वरी पोलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल प्रीतम दाभोळकर यांनी पंचनामा केला, तर पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सीताराम मळीक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

SCROLL FOR NEXT