दामोदर मावजो Dainik Gomantak
गोवा

कविता ही साहित्यातील पहिला हुंकार: लेखक दामोदर मावजो

दामोदर मावजो: धर्मानंद वेर्णेकर यांच्या ‘देगदिगंत’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

दैनिक गोमन्तक

पणजी: कविता हा सर्वश्रेष्ठ साहित्य प्रकार आहे. एखादी व्यथाच मानवाला अभिव्यक्त करते. धर्मानंद वेर्णेकर यांनी आपल्या कवितेतून विविधांगी कॅनव्‍हास उभे केले आहेत. साहित्यातील पहिला हुंकार म्हणजे कविता, असे उद्‌गार ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारप्राप्‍त लेखक दामोदर मावजो यांनी काढले.

धर्मानंद वेर्णेकर लिखित ‘देगदिगंत’ या काव्‍यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मावजो बोलत होते. पाटो-पणजी येथील संस्कृती भवनाच्‍या बहुद्देशीय सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला साहित्‍यिक डॉ. राजय पवार, डॉ. नंदकुमार कामत, पूर्णानंद च्‍यारी, रुपा च्‍यारी, रमा मुरकुंडे, माजी वित्त सचिव दौलत हवालदार, चारूदत्त पाणीग्रही, दिनेश मणेरकर आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

रमा मुरकुंडे म्हणाल्या की, ‘देगदिगंत’ या काव्‍यसंग्रहातील काही कविता प्रत्‍कर्षाने सतीश सोनक यांना समर्पित केल्या असून विचारमंथन, चित्रकला, प्रेम आदींचा संगम त्‍यात दिसून येतो. संग्रही असावा असा हा कविता संग्रह आहे. तर, डॉ. राजय पवार म्हणाले, या काव्‍यसंग्रहातील कविता शास्त्रीत तत्वज्ञान व्यक्त करते. पंचमहाभूतांचा मिलाप कवितेत दिसून येतो. त्‍यामुळे ‘देगदिगंत’ हे त्‍याचे नाव सार्थकीच ठरतं

चारूदत्त पाणीग्रही यांनी सांगितले की, धर्मानंद वेर्णेकर यांच्या कवितासंग्रहाचा अनुवादन अन्‍य भाषांमध्‍ये होणे गरजेचे आहे. दरम्‍यान, दौलत हवालदार, डॉ. नंदकुमार कामत यांनीही विचार मांडले. प्रस्तुत काव्यसंग्रहाचे प्रकाशन ‘संजना पब्लिकेशन’तर्फे करण्यात आले असून हा काव्यसंग्रह सतीश सोनक यांना समर्पित करण्यात आलेला आहे. त्‍यात एकूण १११ कवितांचा समावेश आहे.

प्रा. पूर्णानंद च्यारी यांनी काही कवितांचे सादरीकरण केले. रूपा च्यारी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दामोदर मावजो यांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT