Datta Damodar Naik 
गोवा

'धर्माच्या नावाखाली देऊळ, मठात भरपूर पैसे लुटतात'; लेखक दत्ता नायक यांच्या वक्तव्यामुळे गोव्यात नव्या वादाची शक्यता

Datta Damodar Naik: नायक यांनी हिंदूंच्या केलेल्या अपमानाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Pramod Yadav

मडगाव: उद्योगपती, लेखक आणि काँग्रेसचे माजी नेते दत्ता दामोदर नायक यांनी नुकतेच एका मुलाखतीत देऊळ आणि मठांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकरांनी नायक यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत देवळे व मठ/मंदिरांनांच का म्हणून हिणवावे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दत्ता दामोदर नायक यांनी ७० व्या वाढदिवसानिमित्त एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयावर भाष्य करताना धर्माच्या नावाखाली देवळे, मठात खूप पैसे लुटतात असे वक्तव्य केले आहे. मी देव मानत नाही, असेही त्यांनी या मुलाखतीत म्हटले. दरम्यान, या वक्तव्यावर माजी खासदार सावाईकरांनी आक्षेप घेतला आहे.

"आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे हा ज्याच्या त्याच्या विश्वास व श्रद्धेचा भाग. आपल्या विचारावर ठाम राहणे व त्याचा प्रचार करणे हे देखील योग्यच. पण त्यासाठी देवळे व मठ/मंदिरांनांच का म्हणून हिणवावे?", असा सवाल नरेंद्र सावईकरांनी फेसबुक पोस्टमधून केला आहे.

Narendra Sawaikar FB Post

सावईकरांच्या या फेसबुक पोस्टवर दत्ता नायक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "देऊळ लूट नाही करतायेत हे मान्य करुया. हे भाजप सरकार आम्हाला लुटतंय, त्यावर मि. सावईकर तुम्ही शांत का आहात?" असा सवाल दत्ता नायक यांनी उपस्थित केला.

Datta Naik Reply To Sawaikar FB Post

"दत्ता नायक यांनी गोमंतकीय देवभक्त, देवळे व मठांचा अपमान आणि अवहेलना केली आहे. देवळ आणि मठांना लुटारु म्हणणाऱ्या नायकांचा काँग्रेस शशी थरुर यांच्या हस्ते सत्कार करणार आहे. नायक यांनी हिंदूंच्या केलेल्या अपमानाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे का?", असा सवाल शुभम पर्रीकर या युझरने उपस्थित केला आहे.

या मुलाखतीत दत्ता नायक यांनी ते सेक्युलर विचाराचे असल्याचा उल्लेख करताना राजकाणात देखील सक्रिय होते असे नमूद केले. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी देखील शिफारस झाली होती पण पुढे तसे नाही, असेही नायक या मुलाखतीत म्हणाले.

"मी मुळात सेक्युलर विचाराचा आहे. हिंदुत्ववाद, भाजप, आरएसएस हे मला मान्य नाही. ख्रिश्चन, मुस्लिमांचा द्वेष करुन हा देश खड्यात जाईल. गोव्यात रिअल ईस्टेटमध्ये सगळ्याच स्तरावर मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. आणि भाजपला याचे काहीच पडलेले नाही. आपण एक बरे शासन द्यायला हवी, विकास करायला हवा", असे नायक या मुलाखतीत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT