Mapusa Child Assault Dainik Gomantak
गोवा

Mapusa Child Assault: चार वर्षीय निष्पाप बालकावर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रयत्न; गुन्हा दाखल होताच संशयिताची मनोरुग्णालयात रवानगी

Mapusa Child Assault Attempt: खोर्ली-म्हापसा येथील विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शाळेतील चार वर्षीय मुलावर ५५ वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

बार्देश: खोर्ली-म्हापसा येथील विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शाळेतील चार वर्षीय मुलावर ५५ वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संशयिताला ताब्यात घेतले.

याप्रकरणी मुलाच्या पालकांनी अथवा संबंधितांनी पोलिसांकडे कोणतीही लेखी तक्रार दाखल केली नसल्याने संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याची माहिती म्हापसा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नवीन देसाई यांनी दिली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संशयिताची मानसिक स्थिती सामान्य नसल्याचे निदर्शनास आल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

त्यानंतर पुढील उपचार व निरीक्षणासाठी त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आहे. याप्रकरणी संबंधितांकडून तक्रार प्राप्त झाल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस निरीक्षक नवीन देसाई यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा प्रकार संस्थेतील कर्मचारी व स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून मुलाची सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT