Sexual Assault Case Khorlim Mapusa Dainik Gomantak
गोवा

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Sexual Assault Case Khorlim Mapusa: खोर्ली-म्हापसा येथील विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शाळेतील चार वर्षीय मुलावर ५५ वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली.

Sameer Amunekar

कळंगुट/बार्देश: खोर्ली-म्हापसा येथील विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शाळेतील चार वर्षीय मुलावर ५५ वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकाराची माहिती मिळताच परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी संशयिताला पकडून मारहाण केली. त्यानंतर त्याला म्हापसा पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाशी संशयिताने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हा प्रकार संस्थेतील कर्मचारी व स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून मुलाची सुटका केली. त्यानंतर नागरिकांनी संशयितास चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी संशयिताला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. पीडित बालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, त्याच्या जबाबासह उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

या प्रकरणात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. मात्र, गुन्हा नेमक्या कोणत्या कलमांखाली नोंदविला आहे, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. म्हापसा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत त्या मुलाच्या पालकांकडून तक्रार दिली नव्हती.

बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर

या घृणास्पद घटनेनंतर संबंधित संस्थेतील बालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संस्थेतील सुरक्षा व्यवस्था, बाहेरील व्यक्तींचा प्रवेश आणि बालकांवर देखरेख याबाबत अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT