Mapusa Crime News Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! खोर्लीत कॉलेज युवतीला पळवून नेण्याचा प्रयत्न; संशयिताला अटक

युवतीची धडाडी; मिरचीचा स्प्रे मारुन केली स्वत:ची सुटका

Rajat Sawant

An attempt to abduct a college girl In Goa : म्हापसातील खोर्ली येथे एका कॉलेज युवतीला पळवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. ही घटना आज दुपारी कॉलेज सुटण्याच्या वेळेत घडल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी युसूफ शेख नामक संशयिताला अटक करण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घाटेश्वर नगर, खोर्ली येथे एका कॉलेजच्या युवतीला कॉलेज परिसरातून पळवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार आज दुपारी घडला. याबाबतची तक्रार आज युवतीने दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितावर विनयभंग आणि बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

युसूफ शेख रा. बार्देश असे संशयिताचे नाव असून तो फरार होता. मात्र संशयिताला अटक करण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे. संशयित आरोपी हा युवतीला वारंवार फोन करून मेसेज पाठवत असे. आज दुपारी 1.30 च्या सुमारास संशयिताने पीडित मुलीचा पाठलाग केला. संशयित कारमधून बाहेर येताच युवतीने संशयिताच्या चेहऱ्यावर मिरची पावडर आणि मूव्ह स्प्रेची फवारणी केली.

पीडित मुलीला बॉक्सिंगचे प्रशिक्षण देण्यात आल्याने तीने संशयित आरोपीपासून स्वतःचा बचाव केला. संशयित पळून जात असताना युवतीने त्याचा पाय पकडला आणि मदतीसाठी आरडाओरडा केला, त्यावर स्थानिक जमा झाले आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस येण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.

संशयित आरोपी आणि पीडित मुलगी शेजारी आहेत. दुचाकीचे सुटे भाग देण्याच्या बहाण्याने तो तरुणीला फिरायला घेऊन गेला होता. संशयित आरोपी पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना ओळखत असल्याने तिने त्याच्यासोबत कारमधून प्रवास करण्याचे मान्य केले होते. दरम्यान, कारमध्ये त्याने गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर विनयभंग आणि बलात्कार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT