Atal setu
Atal setu  Dainik Gomantak
गोवा

Atalsetu: येत्या 31 डिसेंबरपर्यंत अटलसेतू पूर्णतः कार्यरत होणार- मुख्यमंत्री

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अटलसेतू (Atalsetu) या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत पूर्णतः कार्यरत होणार आहे. सध्या मेरशी सर्कल ते पणजी उड्डाणपुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने सेतूचे काम प्रलंबित आहे. हे लवकरच पूर्ण केले जाणार आहे, असे लेखी उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी विधानसभेत दिले. आमदार दिगंबर कामत (MLA Digambar Kamat) यांनी अटलसेतू विषयी अतारांकित प्रश्न विचारला होता.

अटल सेतू उभारण्यासाठी सुमारे 596.46 कोटी रुपये खर्च आला असून, खड्डे वगळता पुलावर इतर त्रुटी नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तरात म्हटले आहे. कामत यांनी अटल सेतूची सविस्तर माहिती मागितली होती. त्यात पुलाचा भाग असलेल्या उड्डाणपुलांचा समावेश होता.

नोव्हेंबरमध्ये होणार पुन्हा डांबरीकरण

अटल सेतूवरील रस्त्याला पडलेले खड्डे (Pathholes) हे गंभीर समस्या असून या वर्षी नोव्हेंबरमध्ये रस्त्याचे पुन्हा नव्याने डांबरीकरण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल ( Minister Nilesh Cabral) यांनी विधानसभेत दिली होती. आयआयटी मद्रासने आपल्या अहवालात पुन्हा डांबरीकरण करण्याची सूचना केली आहे. खर्च कंत्राटदाराकडून घेतला जाईल, असे काब्राल यांनी स्पष्ट केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmal Garbage : हरमल वेशीवर कचराच; विद्रूपीकरण थांबवा

Ponda News : फोंड्याच्या मताधिक्यावर भाजप नेत्यांचे लक्ष; विधानसभेसाठी अनेक दावेदार

पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्राच्या आधारावर FIR रद्द होणार नाही, पती-पत्नीमधील वादात HC चा निर्णय

Morjim Beach : किनारपट्टीवर नशेचे सावट गडद ; युवापिढी संकटात

India Economy: भारत दशकातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, चीनला मागे टाकणार; UN नंतर IMF नं वर्तवलं भाकित

SCROLL FOR NEXT