Goa Accident : अटल सेतूवरील अपघातात पोलिस कॉन्स्टेबलचा बळी

कारवरील ताबा सुटल्यामुळे समोरून आलेल्या ट्रकला धडक
Accident on Atal Setu
Accident on Atal SetuDainik Gomantak

पर्वरी : अटल सेतूवर आतापर्यंत अनेक अपघात झाले. मात्र, काल शनिवारी झालेल्या कार व मिनी ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारचालक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अटल सेतूवर अपघातात पहिलाच बळी गेला आहे. सेतूच्या पर्वरीच्या टप्‍प्यात सायंकाळी 6.10 वाजता हा अपघात झाला असून, त्यात पोलिस कॉन्स्टेबल संदीप नाईक (32, मेरशी) याचा मृत्यू झाल्याची माहिती पर्वरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनंत गावकर यांनी दिली.

ही घटना काल शनिवारी सायंकाळी घडली. पणजीकडे जाणाऱ्या मार्गावरील पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारच्या चालकाचा (GA 07 -E 7729 ) ताबा सुटल्याने कार दुभाजकाला जोरात धडकली आणि दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या ट्रकवर (GA 03-N 7869) आपटली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात कारचालक नाईक याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ट्रकचेही मोठे नुकसान झाले. कारची धडक बसल्यानंतर ट्रक पुलाच्या कडेला गेला. मात्र संरक्षक कठड्यामुळे खाली पडण्यापासून बचावला.

Accident on Atal Setu
Free Cylinder in Goa : गुडन्यूज; गोव्यात 37 हजार कुटुंबांना आता मिळणार मोफत सिलिंडर

ट्रकचालक धीरजकुमार (मूळ बिहार) याला जखमी अवस्थेत उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक भट करत आहेत.

मेरशी येथे राहणारा पोलिस कॉन्स्टेबल संदीप नाईक हा हणजूण पोलिस स्थानकावर ड्युटीला होता. ड्युटी संपल्यानंतर आपण आत्याच्या मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जाणार असल्याचे त्याने घरी सांगितले होते. तसा तो कार घेऊन निघालाही होता. मात्र, अटल सेतूवर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. संदीप नाईक हा स्वभावाने मनमिळावू आणि मदतीस सदैव तत्पर असायचा. तो अविवाहीत होता. त्याला एक विवाहीत बहीण आणि भाऊ आहे.

दुसरीकडे खांडोळा-आमोणा पुलाजवळ मोटारसायकल आणि टेम्पोमध्ये झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार मदन आंतोनियो डिसोझा (24, रा. आराडीबांध-सांताक्रूझ) ठार झाला, तर दुसरा स्वार गंभीर जखमी झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com