Betora Ponda Accident Dainik Gomantak
गोवा

Ponda Accident: बेतोडा येथे टेम्पोची धडक बसून वीज खांब पडला; सुदैवाने टळला अनर्थ

वाहतूक विस्कळीत

Akshay Nirmale

Betora Ponda Accident: फोंडा तालुक्यातील बेतोडा येथे एका टेम्पोने वीज खांबाला धडक दिली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. यात हा वीज खांब मोडला आहे. त्यामुळे वीज खात्याचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने शॉर्ट सर्किट न झाल्याने टेम्पोने पेट घेतला नाही. त्यामुळे अनर्थ टळल्याची चर्चा घटनास्थळी होती.

या बाबत पोलिस तसेच वीज खात्याला कळविण्यात आले आहे. काही काळापुरता येथील वीजप्रवाह थांबविला जाऊन येथून टेम्पो हटविला जाऊ शकतो. अग्निशमन दलालाही पाचारण केल्याचे समजते.

दरम्यान, या अपघातामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. काही काळ या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा मनस्ताप वाहनधारकांना सहन करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT