Assurance Dainik Gomantak
गोवा

निवडणूक जवळयेताच आश्वासनांची खैरात!

यापूर्वी केजरीवाल यांनी गोव्यातील बेकार युवकांना रोजगाराची हमी आणि टॅक्सी चालकांना मिटरपासून मुक्ती या अन्य दोन गॅरेंट्या दिल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

मडगाव : मोफत वीज, मोफत पाणी, मोफत तीर्थाटन या आश्वासनानंतर आज आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात महिलांना गृह आधार योजनेखाली जे सध्या दरमहा दीड हजार मिळतात ती वाढवून अडीच हजार करण्याची गॅरेंटी देतानाच या योजनेचा ज्या महिलांना फायदा मिळत नाही त्या राज्यातील 18 वर्षावरील प्रत्येक महिलेच्या खात्यात (Assurance) दरमहा 1 हजार रुपये आम आदमीचे सरकार गोव्यात आल्यास जमा केले जाईल असे आश्वासन दिले.

आज मडगावात दैवद्य भावन येथे झालेल्या आपच्या मेळाव्यात केजरीवाल यांनी आपली ही गोवेकारांसाठी पाचवी गॅरेंटी जाहीर केली. आपचे हे महिला सबलीकरणाचे जगातील सर्वात मोठे पाऊल असेल असे म्हणताना गोव्यातील साडेपाच लाख महिलांना त्याचा फायदा मिळेल असे त्यांनी सांगितले. यापूर्वी केजरीवाल यांनी गोव्यातील बेकार युवकांना रोजगाराची हमी आणि टॅक्सी चालकांना मिटरपासून मुक्ती या अन्य दोन गॅरेंट्या दिल्या होत्या.

यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले, मी या योजना लागू करण्यासाठी जे पैसे लागणार ते जादूने तयार करणार नाही. गोव्याचे एकूण खर्चाचे अंदाजपत्रक 22 हजार कोटींचे आहे. या पैशांतून कामे करताना 20 टक्के भ्रष्टाचार होत आहे असे गृहीत धरले तर ही रक्कम 4 हजार कोटींच्या वर जाते. मी ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्यासाठी जास्तीत जास्त खर्च 1000 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. गोव्यात होणारा भ्रष्टाचार रोखल्यास आमच्याकडे 3000 कोटी रुपये अधिक बाकी राहतील असे ते म्हणाले.

या मेळाव्यात ओल्ड गोवा येथील बेकायदेशीर बांधकाम पाडावे यासाठी 5 दिवस उपोषण करणारे अमित पालेकर हे उपस्थित होते. केजरीवाल यानी त्यांच्या धैर्याचे कौतूक करताना, आणखी तीन तास उपोषण चालू ठेवल्यास मरणही येऊ शकते असे सांगूनही गोव्याच्या भूमीच्या प्रेमासाठी ते आपल्या निर्धारापासून हटले नाहींत अशा शब्दात कौतुक केले. अमित पालेकर, आपचे राज्य निमंत्रक राहुल महाम्बरे, प्रतिमा कुतीन्हो यांची भाषणे झाली. या मेळाव्याला आप कार्यकर्त्यानी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT