Goa AAP Dainik Gomantak
गोवा

पक्षाची सत्ता आल्यास एक वर्षात सोनसोडोचा प्रश्न सोडवू: संदेश तळेकर देसाई

दैनिक गोमन्तक

पणजी: आम आदमी पक्षाचे फातोर्डा येथील उमेदवार संदेश तळेकर देसाई यांनी पक्षाची सत्ता आल्यास एक वर्षात सोनसोडोचा प्रश्न सोडवू, अशी ग्वाही फातोर्डातील जनतेला दिली आहे.

देसाई यांनी सांगितले की, भाजप सरकार दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सोनसोडोतील कचरा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. मडगाव Margao आणि फातोर्डावासीयांना कचरा समस्येचा सामना करावा लागत आहे. (Assurance by goa aap candidate Sandesh Talekar Desai)

कचरा व्यवस्थापनाच्या Waste Management समस्यांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यासोबतच या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या आणि कचरा व्यवस्थापन हाताळण्यासाठी तयार असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडे उपलब्ध आहे. मात्र, काही स्वार्थी हेतूंमुळे सरकारने कचरा व्यवस्थापनाच्या समस्या सोडवल्या जात नाहीत.

अखंडित पाणीपुरवठा आणि वीज, चांगले रस्ते, घरोघरी सेवा यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच, ‘आप’ AAP सरकार सत्तेत आल्यास वर्षभरात सोनसोडोच्या समस्येवर तोडगा काढेल, असेही तळेकर देसाई म्हणाले.

फातोर्डा येथील लोकांच्या विकासावर मी भर देणार आहे. त्यात स्थानिक तरुणांसाठी क्रीडा अकादमी उभारणे आणि स्थानिक शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे यासह एक मनोरंजन केंद्र उभारण्याचे माझे उद्दीष्ट्य आहे. मतदारसंघातील Goa Constituency बेरोजगारी नष्ट करण्यासाठी पर्यावरणपूरक उद्योग सुरू करण्याचा माझा मानस आहे, शिवाय त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त करणे आणि मदत करणे यावर माझा भर असेल, असे तळेकर देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT