Padma Award 2022: CM सावंत आणि दिगंबर कामत यांच्याकडून पद्म पुरस्कार विजेत्याचे कौतुक

स्वामी समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे आदर्शवत काम करत आहेत: CM प्रमोद सावंत
Padma Shri Award
Padma Shri AwardDainik Gomanatk
Published on
Updated on

गोवा: ब्रह्मेशानंद, ब्रह्मानंद यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला असून ही राज्यासाठी कौतुकाची बाब आहे. ही राज्यासाठी अभिमानास्पद बाब, यावर राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी देखील गौरव केला आहे. असून कला, साहित्य आणि शिक्षण, प्रशासकीय सेवा, समाजसेवा, उद्योग आणि व्यापार, क्रीडा, विज्ञान आणि अभियांत्रिकी, औषधनिर्माण, पाककला, योग, अध्यात्म त्याचप्रमाणे कृषी, पशुपालन यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 128 मान्यवरांना यंदाचे पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. यामध्ये चार पद्मविभूषण विजेते, 17 पद्मभूषण विजेते तर 107 पद्मश्री Padma Shri Award विजेते आहेत.(CM Sawant and Digambar Kamat also congratulated Padma Shri Award winners)

Padma Shri Award
Sand Extraction: बेकायदा रेती उत्खनन सुनावणी तहकूब

डॉ.प्रमोद सावंत,‌ मुख्यमंत्री

सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. स्वामी समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे आदर्शवत काम करत आहेत. शिवाय ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी सदोदित गोव्याचे Goa नाव बुलंद केले. फुटबॉल आणि शंखवाळकर असे समीकरण रूढ होते. या दोघांचेही गोमंतकीय जनतेतर्फे अभिनंदन. असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत CM Pramod Sawant म्हणाले.

दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

अाध्यात्मिक क्षेत्रात ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींनी केलेले कार्य अतुलनीय आहे. ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी गोव्यासोबत देशाच्या फुटबॉलसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. या दोघांनाही मिळालेला पद्मश्री पुरस्कार इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com