Ramesh Tawadkar | Goa Assembly Session  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात होणार विधानसभा अधिवेशन; सभापती तवडकरांची

15 ते 20 दिवस चालणार कामकाज

दैनिक गोमन्तक

Goa Assembly Session in July 2023: विधानसभेचे पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याचे संकेत सभापती रमेश तवडकर यांनी दिले आहेत.

हे अधिवेशन १५ ते २० दिवस चालेल, अशी माहितीही त्यांनी दिली. विधानसभेत आयोजित कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते.

सभापती तवडकर म्हणाले, अधिवेशनाच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नसल्या, तरी हे अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात सुरू होईल आणि ते ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालेल. या अधिवेशनात विविध प्रश्नांवर चर्चा होईल.

मागील अधिवेशनावेळी विरोधकांनी अधिवेशनाचा कालखंड वाढवावा आणि अर्थसंकल्पासह म्हादई विषयावर दीर्घ चर्चा करावी अशी मागणी केली होती.

मात्र, सरकारने ती धुडकावून लावली होती. या अधिवेशनात विरोधकांची अपेक्षा निश्चितपणे पूर्ण होईल.

लवकरच तारीख करणार जाहीर

हे अधिवेशन दीर्घकाळ चालणारे असेल. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवावा व म्हादईच्या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी अशी विरोधकांनी केलेली मागणी या अधिवेशनात चर्चेला पुरेसा वाव मिळणार असल्याने पूर्ण होणार आहे.

ज्या ज्या विषयांवर विरोधकांना चर्चा करायची आहे, त्यासाठी मुबलक वेळ मिळेल. दोन ते तीन दिवसांत अधिवेशनाची नेमकी तारीख घोषित करू, असेही सभापतींनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT