मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत  Dainik Gomantaak
गोवा

गोव्यातील विधानसभा निवडणुका मुदतीपूर्वी घेतल्या जाणार नाही

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील (Goa) विधानसभेच्या निवडणुका (Assembly election) मुदतीच्या पूर्वी घेतल्या जाणार नाहीत. भारतीय जनता पक्षाने (BJP) निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी फेब्रुवारी 2022 नंतरच गोव्यातील विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी आज पणजी (Panajim) येथे केले. येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिपादन केले. (Assembly elections in Goa will not be held before the deadline)

भारतीय जनता पक्ष हा नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना सक्रीय ठेवत असतो. निवडणुका केव्हाही झाल्यातरी पक्ष तयारच असतो. मात्र सरकार म्हणून फेब्रुवारी नंतरच निवडणुका घेण्यात येणार आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

खाण महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झालेले असून राज्यपालांची खाण महामंडळाच्या स्थापनेच्या विधेयकाला मान्यता मिळाल्यानंतर सदर प्रक्रिया पुढे जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी या विषयीच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

दरम्यान राज्यातील महाविद्यालय व शिक्षण संस्थांनी फक्त कला व वाणिज्य या विषयाचे पदवीधर तयार करण्याकडेच भर न देता कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करून प्रत्येक महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी स्वयंपूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यानी आज केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT