Goa Minister Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Ponda: फोंड्यात बदलणार राजकीय समीकरणे? विधानसभेसाठी भाजप-मगो युतीचे संकेत; रवींच्या रणनीतीकडे लक्ष

Ponda Constituency: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप - म. गो. युती होण्याचे संकेत मिळायला लागल्यामुळे फोंड्याचे राजकीय वातावरण तप्त व्हायला लागले आहे.

Sameer Panditrao

Ponda Assembly Election Updates

फोंडा: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप - म. गो. युती होण्याचे संकेत मिळायला लागल्यामुळे फोंड्याचे राजकीय वातावरण तप्त व्हायला लागले आहे. या संभाव्य युतीचे पडसाद फोंड्यात अधिक उमटणार यात शंका नसल्यामुळे अनेक जर तरची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांत भाजपचे आमदार तर मडकई या एकमेव मतदारसंघात म. गो. चा आमदार अशी स्थिती आहे. त्यामुळे युतीमुळे कमीत कमी तीन मतदारसंघात तरी समीकरणे बदलू शकतात.

फोंड्यात म. गो.ची बऱ्यापैकी ताकद आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत म. गो.चे तत्कालीन आमदार लवू मामलेदार यांना ३७४० मते प्राप्त झाली होती. २०२२ साली ही मते दुप्पट म्हणजे ७४३७ एवढी झाली. आता ही वाढीव मते म. गो.ची नसून भाटीकरांची वैयक्तिक असल्याचे सांगितले जात आहे. याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या कुर्टी झेडपी निवडणुकीत व नंतरच्या फोंडा पालिका निवडणुकीत आला आहे.

फोंड्यात काँग्रेस बरीच पिछाडीवर आहे. अनेक समस्या असूनसुद्धा काँग्रेस या कानाडोळा करताना दिसत आहे. आता फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनी यासंबंधी एक तातडीची बैठक बोलावली असून त्यातून काय निघते ते बघावे लागेल. एकंदरीत भाजप म. गो. युती झाली तरी आगामी निवडणुकीत फोंड्यात चौरंगी लढत होणार हे निश्चित झाल्यातच जमा आहे.

रवींच्या चालीकडे सर्वांचे लक्ष

कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी आपली रणनीती उघड केली नसली, तरी ते कोणते प्यादे कसे हलवतील हे सांगणे कठीण आहे. सध्या ते रुद्रेश्वर संस्थानच्या संपूर्ण गोवाभर फिरणाऱ्या रथयात्रेत मशगुल असून त्यातून ते सध्या विखुरलेल्या भंडारी समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातून ते कोणता राजकीय पल्ला गाठू पाहतात यावर राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे. याद्वारे ते आपला पुत्र तथा फोंड्याचे नगरसेवक रितेश नाईक यांना विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ‘प्रोजेक्ट’ करू पाहतात असे बोलले जात आहे.

दळवींचा कामाचा धडाका

फोंड्याचे नगरसेवक तथा भाजपचे फोंड्याचे माजी गटाध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी कामाचा धडाका लावला असून प्रत्येक शनिवारी रविवारी ते कोणता ना कोणता उपक्रम राबवताना दिसत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले दळवी सामाजिक कार्य, आरएसएसची पार्श्वभूमी व जनसंपर्क याद्वारे आपले नाव यशाच्या किनाऱ्याला लागेल अशी आशा बाळगून आहेत. मात्र, फोंड्याच्या गटाध्यक्ष पदाकरता त्यांच्या गटातील शौनक बोरकर ऐवजी कृषिमंत्री रवी नाईक यांचे समर्थक हरेश नाईक यांची वर्णी लागणे हा त्यांना ‘सेटबॅक’ ठरू शकतो असे बोलले जात आहे, तरीही ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ ही वृत्ती बाळगून दळवींनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे.

भाटीकरांचे ‘एकला चलो रे’

फोंडा मतदारसंघात या संभाव्य युतीचा जास्त परिणाम होऊ शकतो. युती झाल्यास फोंड्याची जागा भाजपला जाणार हे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत केवळ ७७ मतांनी हरलेल्या म. गो. च्या डॉ. केतन भाटीकरांचे काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. भाटीकरांनीही वाऱ्याची दिशा ओळखून आपली रणनीती बदलायला सुरवात केली आहे. ते सध्या ‘एकला चलो रे’चा मंत्र आळवताना दिसत आहेत. त्याचबरोबर भाजपच्या उमेदवारीवरही त्यांचा डोळा असून त्यादृष्टीने त्यांनी पावले टाकण्यास सुरवात केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. २०२३ साली झालेल्या फोंडा नगरपालिका निवडणुकीपासूनच त्यांनी ‘एकला चलो’ची सुरवात केली होती. आता त्याचा पुढचा भाग यंदाच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT