Assembly Election: Trinamool Congress  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: तृणमूल कॉंग्रेसही गोव्याच्या राजकीय रिंगणात

गोवा तृणमूलसाठी महत्त्वाचा का आहे आणि भाजप, काँग्रेस मुक्त गोवा कसा केला जाऊ शकतो यावर चर्चा

दैनिक गोमन्तक

पणजी: कॉंग्रेस (Congress) प्रमुख विरोधी पक्ष असताना विरोधी पक्षाना नेतृत्व देण्याच्या भूमिकेपासून कॉंग्रेसने पलायन केल्याने निर्माण झालेला राजकीय अवकाश भरून काढण्याचा प्रयत्न तृणमूल कॉंग्रेसने (Trinamool Congress) चालवला आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजप (BJP) आणि कॉंग्रेसलाही रोखण्याच्या अनुभवाच्या ताकदीवर या पक्षाने तिसऱ्यांदा आपले राजकीय भवितव्य गोव्यात (Goa Election) आजमावण्याचे ठरवले आहे.

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरिक ओ ब्रायन आणि प्रसून चक्रवर्ती काल गोव्यात दाखल झाले. ते मधल्या फळीतील नेते आहेत. पक्षाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात त्यांचा समावेश असतो. त्याआधी महिनाभर पक्षाचे काही नेते राज्यात तळ ठोकून होते. त्यांनी काही जणांशी प्राथमिक चर्चा केली. त्यांनी पक्षात यावे यासाठी मनधरणी केली. त्यापैकी काही जणांना कोलकाता येथे नेण्यात आले. तेथे पक्षाच्या ध्येय धोरणांविषयी माहिती देण्यात आली आहे.

काही आजी माजी आमदार, इतर पक्षांचे पदाधिकारी, समाजधुरीण, विचारवंत अशी मोट तृणमूल कॉंग्रेस राज्यात बांधू इच्छित आहे. त्याची सुरवात विधानसभा निवडणुकीतून करण्याचे त्यांनी ठरवले असले तरी लोकसभा निवडणुकीवर त्यांचा जास्त भर असेल असे त्यांना भेटून आलेल्यांशी चर्चा केल्यावर समजले. तृणमूल कॉंग्रेसने अद्याप जाहीरपणे कोणताही कार्यक्रम राज्यात केला नसला तरी त्यांनी आपल्या संपर्क मोहिमेला गती दिल्याचे जाणवत आहे.

तृणमूल कॉंग्रेसची निवडणूक रणनीती प्रशांत किशोर ठरवत आहेत. त्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली दोनशेजण गोव्यात पक्षाचे संघटनात्मक काम करत आहेत, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडूनच गोव्यातून कोलकाता येथे गेलेल्यांशी संवाद साधून गोवा तृणमूलसाठी महत्त्वाचा का आहे आणि भाजप, काँग्रेस मुक्त गोवा कसा केला जाऊ शकतो याची माहिती देण्यात आली आहे.

ममता बॅनर्जी येणार

भाजप शासक राज्यात तृणमूल कॉंग्रेसचा विस्तार करण्याचे ठरविण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गोव्यातील काही बुद्धिजीवींना कोलकाता येथे पक्षाच्या ध्येय धोरणांविषयी माहिती देण्यावर भर देण्यात येणार आहे.

युतीसाठी आमचे प्रयत्न

येत्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांच्या युतीसाठी आपण प्रयत्न करत आहे. तृणमूल कॉंग्रेसला सोबत घेण्याचा विचार आहे. त्यासाठी तृणमूलच्या नेत्यांसोबत आपण चर्चा करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT