37th National Games Dainik Gomantak
गोवा

National Games 2023 Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आसामला पहिले सुवर्णपदक, महाराष्ट्राला उपविजेतेपद

सांघिक गटातील अंतिम लढतीत महाराष्ट्राला 3-0 फरकाने हरवून विजेतेपद पटकावले.

किशोर पेटकर

National Games 2023 Goa: आसामच्या महिला बॅडमिंटन संघाने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळविला. सांघिक गटातील अंतिम लढतीत त्यांनी महाराष्ट्राला ३-० फरकाने हरवून विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

बॅडमिंटन स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. सांघिक अंतिम लढती शनिवारी झाल्या.

महिला सांघिक अंतिम लढतीत अश्मिता चलिहा हिने आसामला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तिने महाराष्ट्राच्या पूर्वा बर्वे हिला २१-१६, २१-११ असे ३३ मिनिटांत नमविले. दुसऱ्या एकेरीत ईशारानी बरुआ हिने आलिशा नाईक हिला पहिला गेम गमावल्यानंतर ४० मिनिटांत ९-२१, २१-१३, २१-१८ असे पराजित केले.

२-० या आघाडीनंतर दुहेरीत बाजी मारत आसामने सुवर्णपदक निश्चित केले. दुहेरीत ईशारानी व अश्मिता जोडीने सिमरन सिंघी व रितिका ठाकर जोडीला २१-१९, २१-१३ असे नमवून आसामच्या स्पर्धेतील पहिल्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT