Court  Dainik Gomantak
गोवा

Assagao House Demolition Case: पूजा शर्माच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी 'फैसला'; सरकारी वकिलांचा युक्तीवाद पूर्ण!

Assagao House Demolition Case: राज्यात मागील काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलेच गाजत आहे.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलेच गाजत आहे. यातच, या प्रकरणातील संशयित पूजा शर्मा हीच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. पणजी प्रधान सत्र न्यायालय आता येत्या बुधवारी (10 जुलै) निर्णय देणार आहे. या घटनेमागे पूजा शर्मा हीच मुख्य सूत्रधार असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसून येत असल्याने तिची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून यावेळी करण्यात आला.

दरम्यान, गेल्या शुक्रवारपासून तिच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी सुरु झाल्यानंतर शनिवारी (6 जुलै) तिचे वकील ॲड. सुरेंद्र देसाई यांनी युक्तिवाद पूर्ण केला होता. यावेळी त्यांना युक्तिवाद करताना या घटनेमागे काही राजकीय असल्याची बाजू मांडली होती. या प्रकरणाशी तिचा काहीच संबंध नसताना तसेच आगरवाडेकर कुटुंबाने दिलेली तक्रार प्रतिज्ञापत्र सादर करुन मागे घेत असल्याची कल्पना तपास यंत्रणेला दिली आहे. तरीही पोलिस अर्जदार पूजा शर्मा हीच्या मागे ससेमिरा लावला आहे.

तसेच, काही कारणास्तव ती मुंबईस्थित (Mumbai) घरी राहत नसली तरी पोलिस मुद्दाम या पत्त्यावर समन्स पाठवून ते घेण्यासाठी ती जाणूनबुजून हजर राहत नसल्याचे दाखवण्याचे प्रयत्न करत आहेत. समन्सची वेगळी तारीख देण्यास तपास यंत्रणा तयार नाही तसेच तिला अंतरिम जामीन देण्यासही विरोध केला जात आहे त्यामुळे पोलिसांना पूजा शर्मा हिची कोठडी हवी आहे हे स्पष्ट होते.

ती लॉ ची पदवीधर असल्याने तिला कायदेशीर नियम माहीत आहेत. हा सगळा बनाव असून त्यामागे काही राजकीय नेते असल्याचा संशय पूजा शर्मा हिच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सुनावणीवेळी मांडला होता.

ख्रिस पिंटो याने आसगाव येथील जागा शर्मा हिला विकली असली तरी आगरवाडेकर कुटुंबाकडे घरपट्टी पावती तसेच पाणी व वीज कनेक्शनला आवश्‍यक असले‌ ‘ना हरकत’ दाखलाही मूळ मालकाने दिलेला आहे. हे घर मोडण्यासाठी बाऊंसर्सना कोणी आणले होते, याची माहिती पोलिस (Police) मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

तिची कोठडी आवश्‍यक!

या घटनेतील पूजा शर्मा हीच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा तपास यंत्रणेने तिच्या अटकपूर्व जामीनाला उत्तर देताना दिला होता. ती जाणुनबुजून समन्स चुकवत आहे. आगरवाडेकर कुटुंबाने त्यांचे घर मोडण्यामागील तक्रारीत पूजा शर्मा हिच्या नावाचा समावेश केला. आतापर्यंत अटक केलेल्या संशयितांच्या जबानीतून काही माहिती समोर आली आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी तिची कोठडी आवश्‍यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT